Sunday, April 19, 2026
HomeEducationमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला भव्य यश प्राप्त
spot_img

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला भव्य यश प्राप्त

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला भव्य यश प्राप्त

एसआयटी गठीत करण्यात यावी.- मान. नागो गाणार

श्रेयश वानखेडे:

नागपूर येथील शिक्षण विभागातील प्रचंड भ्रष्टाचार व बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक मान. उल्हास नरड यांना दिनांक:11/04/2025 रोजी रात्री गडचिरोली येथून अटक करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने याबाबत वारंवार शासन दरबारी तक्रारी करून कारवाईची मागणी केली होती. माजी आमदार नागो गाणार यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग तथा समस्त कार्यकर्त्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्त्या व बोगस शालार्थ आयडी प्रकरणी एसआयटी गठीत करण्यात यावी. नागपूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण नागपुर विभागात बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व बोगस शालार्थ आयडी चे कारनामे झालेले आहे आणि यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्यात शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्ती व बोगस शाळा आयडी वापरून पगार काढण्यात आला होता.

त्यावेळी अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक आणि शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूरचा प्रभार एकाच व्यक्तीकडे होता. त्यामध्ये सुद्धा मान. उल्हास नरड उपसंचालक नागपूर विभाग यांचा हात आहे हे स्पष्टपणे सिद्ध होत आहे.

काही महाविभूतीकडे ते ज्यावेळी शाळेत कार्यरत होते तेव्हा व्यवस्थापनाची हुजूरगिरी काम करत होते. त्यांच्याकडे मासिक नियोजन, वार्षिक नियोजन, दैनिक पाठ टाचण, एकही दिवस शाळेत न गेलेला चा रेकॉर्ड आदी असताना हे काम मी केलं, मी केलं म्हणून नौटंकी करण्याची चर्चा सुरू आहे. यात काम एक तक्रार एक करतो आणि श्रेय दुसरा लाटतो असा प्रकार दिसून येतो.

राज्य शासनाने 2012 पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरत्या बंद केल्या. त्यानंतर सातत्याने काही संस्था चालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला हाताशी पकडून बोगस भरत्या केलेल्या आहे. याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी होत आहे.

बल्लारपूर मध्ये एका नामांकित शाळेतील मर्डर केस मध्ये सापडलेल्या मुख्याध्यापीकेला, जेव्हा शासन पडताळणी करण्यासाठी येते त्यांची सेवा पुस्तिका गायब करून ठेवल्या जाते. त्यांना पेन्शन केस सुद्धा मंजूर करण्यात आली आहे. ज्यावेळी मर्डर झाला होता. त्यावेळी ती कामावर होती. त्याबाबत पुरावा सापडला असल्याची चर्चा आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page