मनुष्य.
कस वाटेल ऐकायला,
ज्यांच्या वर गर्व करावा असा तो तू नाहीस.
ज्याचं पद चिन्ह मार्ग बनावे ,
असा तो तू नाहीस,
डोळे मिटून ज्यावर विश्वास करावा,
असा तो तू नाहीस,
धर्म आणि सेवा तर सोडाच,
उपकार करावे,
असा तो तू नाहीस,
भटकत आहेत सारे जीव या पृथ्वी वर तुझ्या आश्रयाने,हे ‘मनुष्य ‘
देव तर तू नाही,तो बादशहा तू नाही,
तू तर फक्त ते केले ज्यात तुझं भल असेल,
कुणा इतर बदल विचार करशील
,असा तो तू नाहीस.
…..स्वाती यादव
…… चंद्रपूर