२७ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी निमित्त युवा प्रेरणा संवाद व वेशभूषा कार्यक्रम
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाने युवा पिढीने प्रेरणा घ्यावी या करिता या प्रेरणा संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्य वक्ते म्हणून श्री. सच्चिदानंदजी शेवडे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख अतिथी आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, पालकमंत्री डॉ. अशोकजी उईके, केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष श्री. हंसराजजी अहिर, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. हरीशजी शर्मा, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. राहुलजी पावडे, आमदार श्री. किशोरजी जोरगेवार, आमदार श्री. कीर्तिकुमारजी भांगडीया, आमदार श्री. देवरावजी भोंगळे, आमदार श्री. करणजी देवतळे, ज्येष्ठ नेते श्री. चंदनसिंहजी चंदेल, माजी आमदार प्रा. श्री. अतुलजी देशकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिजन्मशताब्दी कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक डॉ. मंगेशजी गुलवाडे, महानगरचे संयोजक श्री. रामपालजी सिंह उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवक व युवतींनी उपस्थित राहण्याचे आवाहन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. महेश देवकते व महानगर अध्यक्ष श्री. विशाल निंबाळकर यांनी केले आहे
|
|








