डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा उपक्रम.
ज्योत्स्ना वानखेडे : सेलू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातील नूतन विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त रविवार दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता तालुकास्तरीय भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित केली आहे. स्पर्धेची प्रश्नपत्रिका 50 प्रश्नाची एनसी क्यूई स्वरूपाचे असेल त्यापैकी 25 प्रश्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित असतील तर 25 प्रश्न महाराष्ट्रातील परिवर्तनवादी समाज सुधारक यांच्या जीवन कार्यावर आधारित असतील. परीक्षा एक तासाची असेल सामान्य ज्ञान स्पर्धा इ. पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व अकरावी ते पदव्युत्तर या तीन गटात संपन्न होणार आहे. तिन्ही गटातील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक रु.3000/- द्वितीय रु.2000/- व तृतीय क्रमांकाचे रु. 1000/- संविधान प्रत बक्षीस देण्यात येणार आहे. तालुक्यातील ज्या शाळांना व विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपली नावे नोंदणी मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, गंगाधर अवचार, प्रा. सुमेध आवटे यांच्याकडे द्यावेत. परीक्षेतील विद्यार्थ्यांना पारितोषक वितरण सोमवार दि. 20 रोजी आयोजित प्रसिद्ध वक्ते उत्तम कांबळे यांच्या व्याख्यान कार्यक्रमात सायं.06 वाजता होईल. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत, अध्यक्ष सुबोध काकडे यांनी दिली. सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा यशस्वीतेसाठी प्रकाश भालेराव, अभिमान पाईकराव, गजानन साळवे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.