Saturday, June 6, 2026
HomeChandrapurचांदा बोळीत मुरूमाची खुली लूट
spot_img

चांदा बोळीत मुरूमाची खुली लूट

चांदा बोळीत मुरूमाची खुली लूट

ब्रह्मपुरीत खुली लूट सुरू : शासनाच्या महसुलाची खुलेआम चोरी, अधिकारी झोपेत

Shreyash Wankhede:

ब्रह्मपुरी शहरातील बोंडेगाव रोडलगत चांदबोडी तलावालगत एका शेतात सुरू असलेला मुरूम भराईचे काम हे संपूर्णपणे बिनरॉयल्टी असून शासनाच्या तिजोरीवर लाखो रुपयांचा डल्ला मारण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. हे काम इतक्या गुपचूप आणि सुसज्ज पद्धतीने करण्यात येत आहे की, यामागे राजकीय वरदहस्त आणि प्रशासनातील काही अधिकार्‍यांचा आशीर्वाद असल्याशिवाय अशक्यच आहे.

सदर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आठ ते दहा फूटांपर्यंत मुरूम भरण्याचे काम सुरू असून, यासाठी लागणारी कायदेशीर रॉयल्टी शासनाला अदा न करता, बिनधास्तरित्या हजारो ब्रास मातिमुरूम भरणे सुरू आहे. याचा थेट परिणाम शासनाच्या महसुलावर होत आहे. रॉयल्टीद्वारे शासनाच्या तिजोरीत जमा होणारे लाखो रुपये या मुरूम माफियांकडून सरळ सरळ चोरले जात आहेत.

हा प्रकार एखाद्या सामान्य माणसाचा नसून, यामागे प्रस्थापित राजकीय पाठबळ असलेले राजकारणी आहेत, हे स्पष्टपणे दिसून येते. ब्रह्मपुरी परिसरात अलीकडच्या काळात विविध ठिकाणी सुरू असलेल्या लेआउट व व्यावसायिक बांधकामांमध्येही अशाच प्रकारे बिनरॉयल्टी मुरूम वापरण्यात आल्याचे स्पष्ट दिसते.

उघडपणे होत असलेल्या या लूटीत महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी अजूनही कारवाईस उतरत नसल्याने एकच प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे; या भ्रष्टाचारातून त्यांनाही वाटा मिळतोय का?

जर अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करत असतील, तर हे कर्मचारी शासनाच्या तिजोरीचे रक्षक नसून चोरांचे सहकारी ठरतात.
आज सामान्य नागरिकाचे मत स्पष्ट होत चालले आहे ते “हे अधिकारीही चोरच आहेत”
कारण जेव्हा चोरी थेट डोळ्यांसमोर होते आणि तरीही कोणतीही कारवाई होत नाही, तेव्हा नागरिक काय निष्कर्ष काढणार? भ्रष्ट मुरूम माफियांवर कारवाई न झाल्यास, शासन आणि प्रशासनावरचा जनतेचा उरलेला विश्वाससुद्धा संपून जाईल.
ब्रह्मपुरीतील हा मुरूम भरणाचा प्रकार म्हणजे केवळ महसुलाची चोरी नव्हे, तर जनतेच्या डोळ्यांदेखत प्रशासनाची पत कमी करणारा भयावह प्रकार आहे. अशा माफियांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकार्‍यांवर तात्काळ कारवाई होणे ही काळाची गरज आहे. अन्यथा ब्रह्मपुरीत लवकरच कायदा आणि सुव्यवस्थेची शिल्लक राहिलेली पत सुद्धा नाहीशी होईल.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page