Wednesday, April 22, 2026
HomeChandrapurचंद्रपूर मनपा आयुक्त यांच्यावरती कारवाई करा : राजेश बेले
spot_img

चंद्रपूर मनपा आयुक्त यांच्यावरती कारवाई करा : राजेश बेले

चंद्रपूर मनपा आयुक्त यांच्यावरती कारवाई करा : राजेश बेले

श्रेयश वानखेडे:
चंद्रपूर मलनिस्सारण केंद्र, पठाणपुरा येथे विश्वराज इनव्होरमेंट प्रा. लि. यांनी शासकीय जागेवर सोलर पॅनल ठेऊन केलेल्या बेकायदेशिर अतिक्रमाबाबत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री अशोक उईके व चंद्रपूर जिल्हा अधिकारी यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत येणा-या मलनिस्सारण शुध्दीकरण केंद्र, पठाणपुरा येथे विश्वराज इनव्होरमेंट प्रा. लि. या खाजगी कंपनीने शासकीय मालकीच्या जागेवर अवैधरित्या खाजगी मालमत्ता सोलर पॅनल ठेऊन अतिक्रमण केले आहे.
या सोबतच अशी माहिती प्राप्त झाली आहे की, चंदपूर शहर महानगरपालिका आयुक्त श्री. विपीन पालीवाल यांनी संबंधीत कंपनीकडून आर्थिक लाभ घेऊन शासकीय जागेवर बेकायदेशीरपणे सोलर पॅनल ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामुळे त्यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केला असुन ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिका-यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
दोषी अधिका-यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
 शासकीय जागेवरील अवैधरित्या सोलर पॅनल त्वरीत हटवून ती जागा चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मालकीत पुन्हा आणण्यात यावी.
भविष्यात अशी अतिक्रमणे होऊ नये म्हणुन संबंधीत अधिका-यांवरती जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
ही तक्रार  सार्वजनिक हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने आपल्या कार्यालयाकडे सादर करण्यात येत आहे. या प्रकरणात त्वरीत लक्ष घालुन कारवाई करावी अशी तक्रार  राजेश वारलुजी बेले संस्थापक-अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page