Sunday, April 19, 2026
HomeParbhaniविविध परीक्षा व स्पर्धा परीक्षांमधिल मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम.
spot_img

विविध परीक्षा व स्पर्धा परीक्षांमधिल मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम.

विविध परीक्षा व स्पर्धा परीक्षांमधिल मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम.

श्रेयश वानखेडे: येथील अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी तर्फे सिरातून नबी निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, सामान्य ज्ञान व इस्लामीक क्विझ काॅंन्टेस्ट सह दहावी, बारावी, नीट, सिईटि व इतर विविध स्पर्धा परीक्षांमधिल यशस्वी व गुणवंत मुस्लिम विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन साई नाट्यगृह महेश नगर, सेलू येथे रविवार दिनांक २९ जुन रोजी दुपारी १:३० वाजता करण्यात आले आहे.या कार्य क्रमाच्या अध्यक्षस्थानी अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते शेख महेमुद हे राहणार असून प्रमुख वक्ते व पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्याख्याते मराठी मुस्लिम चळवळीचे संस्थापक तथा दंगा मुक्त महाराष्ट्र अभियानचे संयोजक शेख सुभान अली, प्रसिद्ध स्लामिक स्काॅलर आर्किटेक्ट शेख अर्शद, ऑल इंडिया आईडल टिचर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख रहिम हे उपस्थित राहुन सामाजिक व शैक्षणिक विषयांवर वर प्रबोधनात्मक मार्गदर्शन करणार आहेत.सदरील कार्यक्रमास जास्तीत जास्त बंधु-भगिनिंनी, विद्यार्थी -विद्यार्थिनिंनी उपस्थित राहावे असे आवाहन अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष इंजिनिअर अनीस कुरेशी, सचिव हाजी शफीक अली खान सह सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page