चहाटपरीवर छापा टाकून देशी दारू जप्त
श्रेयश वानखेडे:- बल्लारपूर पोलीस स्टेशन चे वाहतूक पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत बामणी मेनरोड वरील स्वागत गेटजवळील एका चहाटपरीवर छापा टाकून अवैधरित्या देशी दारू विकणाऱ्या इसमाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून तब्बल ८२ नग रॉकेट संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या बाटल्या, एकूण अंदाजे किंमत २८७० रुपये, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई २३ जुलै रोजी करण्यात आली.
बल्लारपूर पोलीसांनी गुप्त बातमीच्या आधारे पोलिसांनी चहाटपरीवर छापा टाकला असता, तिथे विजय वामन उपरे (६०) रा. साईबाबा वॉर्ड, बल्लारपूर हा इसम दारू विकताना आढळून आला. ओट्याखाली लपवून ठेवलेल्या कापडी शैलीतून दारूच्या बाटल्या सापडल्या. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर कारवाई बल्लारपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ. गजानन डोईफोडे, पोलीस हवालदार गजानन झाडे, राजू बगमारे, अजय खरकाटे, पोअं संदेश देवगडे, प्रणय वानखेडे व राहुल धुडसे यांच्या पथकाने केली.