Monday, May 4, 2026
HomeChandrapurजिल्हा परिषद चंद्रपूर शैक्षणिक गुणवत्ता सभा उत्साहात संपन्न
spot_img

जिल्हा परिषद चंद्रपूर शैक्षणिक गुणवत्ता सभा उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद चंद्रपूर शैक्षणिक गुणवत्ता सभा उत्साहात संपन्न

श्रेयश वानखेडे:दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे मान. नामदार श्री दादाजी भुसे, मंत्री, शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेत शैक्षणिक गुणवत्ता आढावा उत्साहात संपन्न झाली.

      यावेळी  मा. आमदार किशोर भाऊ जोरगेवार, माधुरी सावरकर, विभागीय उपसंचालक, नागपूर विभाग, दिपेंद्र लोखंडे, सहाय्यक संचालक, मा.गिरीश धायगुडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर मा. नूतन सावंत,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन मा. डॉ.विनीत मत्ते, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर

मा.अश्विनी सोनवणे शिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद ,चंद्रपूर मा. राजेश पातळे, शिक्षणाधिकारी ,माध्यमिक, जिल्हा परिषद चंद्रपूर मा.अतुल गायकवाड, मुख्य वित्त तथा लेखा अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर

मा.धनंजय साळवे ,समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर, मा. विशाल देशमुख,उपशिक्षणाधिकारी,प्राथमिक जिल्हा परिषद,चंद्रपूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  अश्विनी सोनवणे केळकर यांनी केले. श्रीम.सोनवणे यांनी जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत राबवले जाणारे शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम अंतर्गत सर्व योजनांची व उपक्रमांचे पीपीटी द्वारे सादरीकरण केले. श्री. राजेश पातळे  यांनी पवित्र पोर्टल पद भरती ची माहिती दिली.

डॉ. विनीत मत्ते, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांनी परख राष्ट्रीय सर्वेक्षण 2024 मधील चंद्रपूर जिल्ह्याची प्रगती विश्लेषणात्मक अहवालाचे सादरीकरण केले

यानंतर जिल्ह्यातील आयडल शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सादरीकरण केले .

श्री दीपक गोतावळे, श्री अविनाश जुमडे,  श्रीमती सुधा वासाडे,  श्री गिरीधर पानघाटे, श्रीमती मोहिनी देशमुख, श्रीमती सविता झाडे, श्री अजय मुसळे, श्री अली अजानी, श्रीम.सोनाली ज्ञानवल , श्रीम. शिल्पा ठाकरे यांनी सादरीकरण केले.

 आमदार किशोर  जोरगेवार  यांनी  मार्गदर्शन केले. मान. नामदार श्री दादाजी भुसे, मंत्री, शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी आपले दैवत विद्यार्थी यांच्यासाठी राबणाऱ्या आयडॉल शिक्षकांचे पुनश्च एकदा अभिनंदन केले. गडचिरोली येथील दुर्दैवी अपघातात चार विद्यार्थी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याबद्दल त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर जखमी झालेल्या दोन विद्यार्थ्यांना तात्काळ हेलिकॉप्टरने नागपूरला पाठवले व त्यांच्यावर शासनातर्फे खर्च करण्यात येणार याबाबत याबद्दल माहिती सांगितली.

मान. मुख्यमंत्री महोदयांनी झालेल्या अपघाताबद्दल मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली तर जखमी बद्दल विचारपूस केल्याची माहिती दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील रिक्त पदे भरून देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार याबाबत सांगितले. सामाजिक आरक्षणासंदर्भाततील सर्व प्रश्न मार्गी लागणार असून येत्या पुढील काळात भरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार याबाबत सांगितले. सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेने शाळा भेटी करताना शिक्षकांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात आणि त्या सोडवण्यासाठी त्यांना मदत करावी याबाबत सूचना केली.  चिचपल्ली शाळेतील शिक्षकांचे  अभिनंदन केले.  तसेच मंत्री महोदयांनी  पटसंख्या   वाढवण्यासाठी प्रयत्न करावे तसेच अपार व आधारचे काम वाढावे तसेच निपुणचे अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या  सूचना दिल्या.

         विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर अटल क्रीडा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी राज्यस्तरावर मान. बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय कला स्पर्धा सुरू करणार असल्याचेही सांगितले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांच्या सुद्धा क्रीडा व कला स्पर्धा राज्यस्तरावर सुरू करणार असल्याबाबत सांगितले. अशैक्षणिक काम कमी झाली पाहिजे यासाठी विविध 15 समित्यांपैकी चार समित्या केल्याचेही  सांगितले. टप्पा अनुदानाचा चांगला निर्णय मान. मुख्यमंत्री महोदयांनी घेतल्या बाबत सांगितले.   गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण हे शिक्षक स्वतः गुणवत्तापूर्ण आनंददायी असेल तरच दिले जाऊ शकते. त्यामुळे शिक्षकांनी याकडे विशेष लक्ष द्यावे असे सांगितले.

मंत्री श्री.भुसे पुढे म्हणाले की सिंगापूरला 48 शिक्षकांना अभ्यासासाठी पाठवण्यात आलेले होते. तेथे राष्ट्र प्रथम ही भावना असून शिक्षक पेशा समर्पित भावनेने केला जातो. त्या प्रमाणे शिक्षकांनी वागले पाहिजे. राज्यातील मा. राज्यपाल,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व  अधिकारी यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला ही अतिशय आनंदाची बाब आहे. तसेच

येणाऱ्या 15 ऑगस्ट ला देशभक्तीपर गाण्यावर कवायत घेण्याबाबत सूचनाही त्यांनी केली .या कवायतीमध्ये सर्व पालक व लोकप्रतिनिधी यांना सहभागी करून घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले. आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण हे राज्याचा केंद्रबिंदू आहे हे अधोरेखित केले.

           कला, क्रीडा, खेळ, स्काऊट गाईड या उपक्रमांना प्राधान्य द्यावे  असे सांगून मंत्री श्री.भुसे म्हणाले की आयडॉल शिक्षकांचे कार्य फक्त स्वतःच्या शाळेपुरते मर्यादित न राहता केंद्रातील सर्व शाळांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याचा आदर्श सर्व शाळांनी घ्यावा याबाबतही त्यांनी आवाहन केले. जिल्हा परिषदेने शाळांच्या भौतिक सुविधा निर्माण करण्याकडे विशेष लक्ष द्यावे. प्राधान्याने शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छ स्वच्छतागृहे निर्लेखनाचे सर्व कार्य, नवीन इमारती बांधकाम, क्रीडांगण, वाचनालय इत्यादी सुविधांकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे असेही त्यांनी सूचित केले.  पालकांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड तयार करण्याबाबत मंत्री महोदय यांनी सूचना केली. राज्य स्तरावरून हेल्थ कार्ड लवकरच उपलब्ध करून दिल्या जाणार आहे याबाबत सांगितले. शिष्यवृत्ती इयत्ता चौथी व सातवीसाठी केली जाणार तसेच यावर्षी चौथी पाचवी सातवी आठवी या इयत्ता साठी शिष्यवृत्ती परीक्षा होणार असे सांगितले. येणाऱ्या काळात शिष्यवृत्तीधारकांची संख्या वाढवण्यात येणार असल्याबाबतचे सांगितले. शाळेत राखी बनवणे यासारखी उपक्रम राबवण्यात यावे याबाबत सूचना केली. शाळेत शिस्त व स्वच्छता जाणीवपूर्वक लक्ष देऊन निर्माण करावी याबाबत सांगितले. सकाळी उठून आजी-आजोबा आई-वडील शाळेतील गुरुजनांना मान वंदना द्यावी असे सांगितले. व्यसनाधीनतेपासून मुक्तीसाठी काम करण्याची गरज आहे.

       विवेक इतत्लवार यांनी सूत्रसंचालन केले. विशाल देशमुख यांनी आभार मानले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page