मान. आयुक्त चंद्रपूर महानगरपालिका यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंद करावा- राजेश बेले
ज्योत्स्ना वानखेडे :
चंद्रपूर शहर महानगरपालिका. चंद्रपूर अंतर्गत दिनांक 25/04/2026 रोजी शनिवारच्या दिवशी ऐतिहासिक गोंडकालीन प्रसिध्द रामाळा तलाववांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. तसेच तलावातील पाणी अत्यंत दुषीत झाले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळलेले आहेत. तसेच तलावातील इतर लहान जीवसृष्टी देखील मृत झाल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गधीचं वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचा परिणाम मानव पशु, पक्षी व इतर सजीवाच्या जीवाला आहे.
दिनाक 27/04/2026 रोजी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे निदर्शनास आले. तलावातून दुर्गंधीचा नागरिकाना त्रास होत आहे. मा आयुक्त. चंद्रपूर शहर महानगर पालिका चंद्रपूर यानी ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे परिस्थीती अधिकच बिकट होत आहे. तलावाचे जतन करणे ही चंद्रपूर शहर महानगर पालिका ची जबाबदारी असून त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण आलेला आहे. म्हणून मा. आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका याच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करून तत्काळ तलाव स्वच्छ व उपाययोजना करण्यात यावी. अशा आशयची तक्रार :-राजेश वारलुजी बेले, संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था. चंद्रपूर यांनी मा. पोलीस निरीक्षक चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन यांना केली आहे.