श्रेयश वानखेडे:
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर संचालित महात्मा ज्योतिबा फुले ज्युनिअर कॉलेज तर्फे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील सोळा शाळा मधील एकूण 279 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत केजीएन पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बल्लारपूरच्या वर्ग दहावीच्या विद्यार्थी अभिषेक डोनेवार याने उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला.
अभिषेक डोनेवारच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक शेख महमूद, प्रिन्सिपल स्वाती वाघमारे व्हाईस प्रिन्सिपल सीमा माकडे, श्वेता डोनिवार आदींनी शाळेच्या असेंबली मध्ये सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पुष्पगुच्छ देऊन व ताडया वाजवून त्याचे अभिनंदन केले.