*हिंग्लाज भवानी हायस्कुल, बाबुपेठ, चंद्रपूर येथे युवक मेळावा*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर, व जनहिताय मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित झेप व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने *हिंग्लाज भवानी हायस्कुल, बाबुपेठ, चंद्रपूर येथे युवक मेळावा* दि. 05/10/2026 ला पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मान. प्रकाशजी पालीवाल यांनी शालेय जीवनापासूनच व्यसनमुक्त राहून जीवनात कसे उत्कर्ष साधले जाऊ शकते, या विषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच झेप चे समुपदेशक सौ. सपना दिंडे यांनी मोबाईलचे व्यसन हे कसे जीवन उध्वस्त करू शकते याचे अनेक दाखले देत विध्यार्थ्यांना मोबाईल च्या अति वापराचे दुष्परिणाम स्पष्ट करुन दिले.
समुपदेशक श्री. रवि दिंडे यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष साठे यांनी व्यसनाच्या आहारी जाने हे कौटुंबिक प्रगती, समाजाची प्रगती पर्यायी राष्ट्राच्या प्रगतीला कसे बाधक ठरते हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री. डी एस श्रीरामे यांनी केले तर आभार श्री. एम आर पाखमोडे यांनी मानले. कार्यक्रमाला कु. राखडे मॅडम, राजू कोटकर, भास्कर कष्टी, दिनकर गिरडकर यांनी सहकार्य केले कार्यक्रमाला शाळेतील सर्व विध्यार्थी तसेच परीसरातील पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.