Tuesday, August 11, 2026
spot_img
HomeIndiaपत्रकार रमेश निषाद यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव

पत्रकार रमेश निषाद यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव

पत्रकार रमेश निषाद यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव

श्रेयश वानखेडे  :- ३० ऑगस्ट २०२५ रोजी तेलंगणा राज्यातील सूर्यावरम प्रताप रेड्डी तेलुगु युनिव्हर्सिटी, हैदराबाद येथे एशिया वेदिक इंटरनॅशनल कल्चर अँड रिसर्च स्पूथी अकॅडमीतर्फे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात दैनिक महाविदर्भचे बल्लारपूर प्रतिनिधी व महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा, बल्लारपूरचे अध्यक्ष रमेश निषाद यांना बेस्ट जर्नलिस्ट ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
         या वेळी तेलंगणातील अनेक मान्यवर, चित्रपटसृष्टीतील कलाकार, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक, पोलीस अधिकारी, राजकीय नेते तसेच पत्रकार यांना डॉक्टरेट पदवी, भारतीय स्मृती सेवा रत्न पुरस्कार, भारतीय नारीशक्ती पुरस्कार अशा सन्मानांनी गौरविण्यात आले.
       पत्रकार रमेश निषाद हे गेली पंचवीस वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून, त्यांच्या लेखनातून जनसामान्यांच्या समस्या त्यांनी सतत प्रकाशझोतात आणल्या आहेत. त्यामुळे त्यांचे कार्य गाजत असून, या गौरवामुळे त्यांचा सन्मान अधिकच उंचावला आहे.
        कार्यक्रमाला डॉ. गुडीरी, मडिकायला अशोक ओंकार, मल्लम रमेश, अभिनेते जेनी व घरशाना श्रीनिवास, लॉयन डॉ. आकुला रमेश, श्री सई राघवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जी. व्ही. सुरेश रेड्डी, माजी आमदार बी. व्ही. राव, स्पूथी अकॅडमीचे अध्यक्ष डॉ. दिगंबर सिंह, आंतरराष्ट्रीय सल्लागार अन्नपूर्णा प्रसाद, राजकीय नेते रमेश गुप्ता, वेंकटेश्वरलू, समाजसेवक दत्तात्रेय, पोलीस अधिकारी कृष्णा रेड्डी, वेंकटेश, श्रीनिवास रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.
       एशिया वेदिक इंटरनॅशनल कल्चर अँड रिसर्च स्पूथी अकॅडमीचे चेअरमन लॉयन डॉ. आकुला रमेश यांच्या प्रयत्नामुळे हा भव्य सोहळा पार पडला. कार्यक्रमातील प्रत्येक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page