Friday, December 12, 2025
HomeChandrapurआमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास
spot_img

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

मुल येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणेल

तंत्रनिकेतन महाविद्यालयाबाबत आ. मुनगंटीवार यांची अपर मुख्य सचिवांशी सविस्तर चर्चा
मुलसह पोंभुर्णा, सावली, सिंदेवाही आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार लाभ

Jyotsna Wankhede: जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला नवे परिमाण देण्यासाठी मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होणार आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. आदिवासी बहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात सामील होण्यासाठी हे महाविद्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

यासंदर्भात आज मंत्रालयात तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांची भेट घेऊन मुल येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयासंदर्भात सकारात्मक आणि सविस्तर चर्चा पार पडली.

आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिले होते निर्देश:
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुल येथे शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने त्यांनी तंत्रशिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश दिले होते.

युवकांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी:

चंद्रपूर जिल्ह्यात उद्योगांना चालना देण्यासाठी आयोजित ‘अ‍ॅडव्हांटेज चंद्रपूर’ परिषदेत तब्बल ७५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले. आर्सेलर मित्तल, लॉयड स्टीलसारख्या नामांकित कंपन्या मुल येथे उद्योग उभारणीसाठी पुढाकार घेत असून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. या उद्योगांसाठी सुमारे २५ हजार कुशल मनुष्यबळाची गरज भासणार असल्याने विद्यार्थी तंत्रशिक्षणाने सक्षम व्हावेत यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्याचा पुढाकार घेतला आहे,हे विशेष.

या विद्यार्थ्यांना होणार लाभ:
या उपक्रमामुळे मुलसह पोंभूर्णा, सावली, सिंदेवाही आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना लाभ होणार आहे. मुल येथे यापूर्वीच शासकीय कृषी महाविद्यालय सुरू झाल्याने शहराच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान मिळत आहे. शासकीय पॉलिटेक्निक सुरू झाल्यास मुल हे शिक्षणासाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page