Tuesday, September 15, 2026
spot_img
HomePolice*सार्वजनिक शांतता भंग करणा-या विनापरवाना डिजे वाजवुन नियमाचे उल्लंघन करणा-यांवर दुर्गापूर येथे...

*सार्वजनिक शांतता भंग करणा-या विनापरवाना डिजे वाजवुन नियमाचे उल्लंघन करणा-यांवर दुर्गापूर येथे कार्यवाही*

*सार्वजनिक शांतता भंग करणा-या विनापरवाना डिजे वाजवुन नियमाचे उल्लंघन करणा-यांवर दुर्गापूर येथे कार्यवाही*

*ज्योत्स्ना वानखेडे*: दिनांक 14/09/2026 रोजी वेळ 19/00 वा. पोस्टे दुर्गापूर येथे पेट्रोलींग करीत असता माहिती मिळाली की, कोंडी वार्ड क्र 6 उर्जानगर नेरी येथे गणेशोत्सव आगमन दरम्यान, गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत डी.जे. वाजविणारा अमन गंगाधर गोहणे रा. बाबराळा ता. मुल जि. चंद्रपूर हा अत्यंत तीव्र आवाजात डी.जे. (D.J.) ध्वनीक्षेपकाचा वापर करीत आहे. यावरून त्यांना मा. पोनी. शेगावकर साहेब यांनी सदर ईसमाच्या डिजेची ध्वनीमापक यंत्राद्वारे तपासणी करून डेसीबल चेक केले असता त्यामध्ये आवाजाची तिव्रता 105.5 डेसीबल आल्याने त्यास पंचासमक्ष सुचना देवून स्टे. डा. सान्हा क्र 24/26 वेळ 19/07 वा. नोंद केली. परत तोच ईसम त्याच प्रकारे जोरजोरात अत्यंत तीव्र आवाजात डी.जे. वाजवित असल्याची माहिती प्राप्त होताच आम्ही पोस्टॉफ पोहवा 1123 भोयर, पोशि हरीश तलांडे व ध्वनीमापक सयंत्र सह यातील पंचाना घटनास्थळी पाचारण करून सदर ठिकाणी जावून डी. जे. चा आवाज क्षमतेपेक्षा जास्त कर्णकर्कश येत असल्याने आम्ही ध्वनीमापक सयंत्राद्वारे पंचसमक्ष तपासणी केली असता आवाजाची तिव्रता डेसीबल 123.05 इतकी आली. व सदर ईसमास डिजे वाजविण्याचा परवाना विचारला असता परवाना नसल्याचे सांगितले.

*सदर डिजे साहीत्याची जप्ती कार्यवाही ती खालील प्रमाणे ….*

1) Amplifier शॉर्प ऑडिओ, मॉडेल नंबर एम टी – 1201 किंमत – 1,00,000 रुपये

2) Speaker संख्या – 2, टॉप – 1 किंमत – 4,50,000 रुपये

3) डि. जे. मिक्सर कंपनी – डायनाटेक, किंमत – 1,00,000 रुपये

4) इतर साहित्य – जनरेटर 15 केव्ही, पार्क लाईट – 2 – 1,00,000 रुपये.

5) गाडी क्र – एम एच 34 सि. क्यु. 3494 (महिन्द्रा सुपरो) किंमत – 6,00,000 रुपये.

6) एकुन किंमत – वाहन व डिजे साहित्याची किंमत 13,50,000 रुपये.

सदर प्रकरणी मा. पोलीस अधिक्षक साहेब चंद्रपूर यांनी कलम 38 मपोका अन्वये दिलेला आदेश निर्गमीत असतांना सुध्दा यातील डिजे चालकांनी सदर आदेशाचे उल्लंघन केल्याने आम्ही दोन पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करुन सदर साहित्यासह पोस्टे हजर आलो व सदर डी. जे. चालक नामे अमन गंगाधर गोहणे रा. बाबराळा ता. मुल जि. चंद्रपूर याचे कृत्य मपोका कलम 136, 70 अन्वये होत असल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची माझी कायदेशीर फिर्याद आहे.

सदर कार्यवाही मा. आयुष नोपानी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधिक्षक मा. ईश्वर कातकडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांचे मार्गदर्शनात पोनि शेगावकर, पोउपनि पंकज वासाडे, पोहवा 1123 भोयर, पोशि तलांडे 1068 यांनी केली.

सार्वजनिक शांतता भंग करणा-या विनापरवाना डिजे वाजवुन नियमाचे उल्लंघन करणा-यांवर यापुढेही अशीच कार्यवाही करण्यात येईल.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page