चांदा इको फाउंडेशन तर्फे आझाद बगीच्यात स्वच्छता अभियान
Jyotsna Wankhede:
शासनाच्या स्वच्छता ही सेवा 2025 या अभियाना अंतर्गत चांदा इको केअर फाउंडेशन तर्फे आझाद बगीचा चंद्रपूर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
बगीच्यातील परिसरात प्लास्टिक, कचरा, प्लास्टिकच्या बॉटल, रॅपर्स उचलून ते कचराकुंडीत टाकून बगीच्यातील परिसर स्वच्छ करण्यात आला.
स्वच्छता अभियान यशस्वी करण्याकरिता चांदा इको केअर फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक आंबेकर ,उपाध्यक्ष अशोक दुर्गे , सचिव पद्माकर मोरे, कोषाध्यक्ष प्रमोद केळझळकर व सर्व सदस्य अतुल देवतळे, नितीन फुलझले, आनंद निरंजने ,प्रदीप देवईकर, संजय रांगणकर, अविनाश रेशीमवाले, यांनी सहभाग घेतला.