Monday, April 20, 2026
HomeChandrapurमेसर्स मिलियन स्टील प्रा. लिमिटेड कंपनीच्या जनसुनावणी उपस्थित नागरिकांचा विरोध.
spot_img

मेसर्स मिलियन स्टील प्रा. लिमिटेड कंपनीच्या जनसुनावणी उपस्थित नागरिकांचा विरोध.

मेसर्स मिलियन स्टील प्रा. लिमिटेड कंपनीच्या जनसुनावणी उपस्थित नागरिकांचा विरोध.   

श्रेयश वानखेडे:  चंद्रपूर तालुक्यातील बेलसनी येथे मेसर्स मिलियन स्टील प्रा.लिमटेडच्या स्पाॅन्ज आयरनच्या 2,31,000 TAP  उत्पादन कंपनी सुरू करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांच्या वतीने जनसुनावणी बेलसनी दिनांक: 30/05/2025 ला घेण्यात आली होती. ‌‌परंतु परीसरातील 80 टक्के नागरिकांनी विरोध केला. चंद्रपूर तालुक्यातील उद्योगाची संख्या भरपूर आहे. तसेच जगात चंद्रपूर जिल्ह्याच्या चौथा क्रमांक असतांना आणखी अश्या प्रदूषण करणाऱ्या उद्योगांची आवश्यकता नव्हती.

परंतु सामान्य नागरिकांना केवळ पाच वर्षांत एकदा मतदान करण्याचा अधिकार आहे. त्याचे कोणतेही अधिकारी ऐकून घेत नसताना त्यामुळे सामान्य माणूस सामोरं येत नाही.  तेव्हा राजकीय पक्ष पुढारी सामान्य नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा सामान्य नागरिकांना ही जनसुनावणी म्हणजे केवळ देखावा आहे असे वाटते. तसेच परिसरातील अनेक नागरिकांना आज होत असलेल्या जनसुनावणी माहिती नव्हती. तेव्हा कंपनी अधिकारी यांनी परिसरातील गावांना सि.आर.फंडातून अनेक लोकोपयोगी कामे केली जातील असे आश्वासन देऊन लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी काय होईल याचे उत्तर सुद्धा कंपनी दयावे अशी मागणी नागरिकांनी केली. आज या परिसरात कोलवाशरी फुलको रेल्वे साईडींग आहे.तेव्हा त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा सामान्य नागरिकांना फार मोठा सामना करावा लागतो आहे. तेव्हा परिसरात होणाऱ्या प्रदूषणाचा विषय कंपनी पहिले सोडवायला हवा त्यानंतर उद्योग सुरू करावा अशी आक्रमक भूमिका परिसरातील नागरिकांनी घेतली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page