कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
मा. आ. रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथतुला व अभिष्टचिंतन सोहळा संपन्न.
Jyotsna Wankhede: दि. 24 ऑक्टोबर 2025 शुक्रवार रोजी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्व साधारण सभा साई नाट्यमंदिर येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. याच दिवशी माजी आमदार मा. रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथतुला व अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या निमित्ताने कृषि उत्पन्न बाजार समितीकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख ( ₹5,00,000/-) रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. हा धनादेश बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे यांनी आमदार रामप्रसाद जी बोर्डीकर साहेब यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रदान केला.सभेच्या प्रारंभी बाजार समितीचे सचिव दीपक शिंगणे यांनी समितीचा वार्षिक अहवाल सादर केला. यामध्ये गेल्या वर्षभरात बाजार समितीने केलेली विविध विकासकामे, शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविलेल्या योजना तसेच आर्थिक व्यवहारांची सविस्तर माहिती देण्यात आली.यानंतर सभेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी उपस्थित सदस्य, सोसायटी प्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिका री व शेतकरी वर्गाला संबोधित करताना बाजार समितीच्या कार्य प्रणालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध असून भविष्यात बाजार समिती च्या कार्यक्षेत्रात अधिकाधिक सुविधा उभारल्या जातील. याप्रसंगी सध्या सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या पद्धतीने काम करत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो त्यामुळे प्रथमत: सभापती डॉ. संजय रोडगे यांचे सर्व शेतकऱ्यांनी कौतुक केले. सभेदरम्यान काही शेतकरी बांधवांनी आपले विविध प्रश्न व अडचणी मांडल्या. सभापती डॉ. रोडगे यांनी प्रत्येक प्रश्नाचे गांभीर्याने ऐकून तत्काळ निराकरणाचे आश्वासन दिले. तसेच बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी साधने, साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज सुविधा, आणि विपणनासाठी अधिक चांगले दर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने लवकरच उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.या प्रसंगी सुरेश भुमरे जिल्हाध्यक्ष भाजपा परभणी, मा. शिवाजी भरोसे महानगर जिल्हाध्यक्ष भाजपा परभणी, मा. सारिका पारवे जिल्हाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा, मा. डॉ. विद्या चौधरी माजी जिल्हाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा, मा. आबासाहेब टरपले अध्यक्ष मराठवाडा सामाजिक फाउंडेशन, मा. डॉ. केदार कटिंग भाजपा परभणी जिल्हा लोकसभा समन्वयक, मा. गणेश काटकर तालुका अध्यक्ष भाजपा सेलू, मा.अशोक शेलार शहराध्यक्ष भाजपा सेलू, संचालक अँड. दत्ताराव कदम, माऊली ताठे,प्रसाद डासाळकर, अनिल पवार,भास्करराव पडघन, ज्ञानेश्वर राऊत,केशव सोळंके, अनिल बर्डे,शैलेश तोष्णीवाल, सुरेंद्र तोष्णीवाल,दत्तराव मगर सोनेकर,अशोक शेलार, माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, संजय साडेगावकर,जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोरजी बाहेती, द्वारकादास झवर, सोसायटींचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य भाजपाचे सर्व पदाधिकारी व विविध प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना मा.आमदार रामप्रसाद जी बोर्डीकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत नाविन्यपूर्ण बदल घडवण्यासंदर्भात शेतकऱ्यांना आश्वासित केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बाजार समिती मार्फत नवे प्रकल्प, डिजिटल सुविधा व पारदर्शक व्यवहार पद्धती राबविण्याबाबत कटिबद्ध असल्याचे नमूद केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बाजार समितीच्या अधिकारीवर्गाने केले.या कार्यक्र मामुळे बाजार समितीच्या कार्यातील पारदर्शकता,शेतकरी हिताची भूमिका आणि सामाजि क बांधिलकी यांचा प्रत्यय सर्वांना आला.