Friday, December 12, 2025
HomeParbhaniसंदीप लहाने यांची शिवसेना सेलू तालुका प्रमुख पदी निवड.
spot_img

संदीप लहाने यांची शिवसेना सेलू तालुका प्रमुख पदी निवड.

संदीप लहाने यांची शिवसेना सेलू तालुका प्रमुख पदी निवड.

Jyotsna Wankhede: हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारणे प्रेरित होऊन गेल्या ४० वर्षापासून सामाजिक ,राजकीय व लोकोपयोगी जबाबदाऱ्या सांभाळणारे शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष तथा गटनेते संदीप हरिभाऊ लहाने यांची नुकतीच शिवसेनेच्या सेलू तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली असून परभणी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी त्यांना निवडीचे पत्र सुपूर्द केले आहे. सतत १५ वर्ष सेलू – पाथरी मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने आमदार पदाची यशस्वीपणे धुरा सांभाळले माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचे ते सुपुत्र असून सतत वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सोबत राहून व शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. तसेच दोन वेळा नागरपरिषदेची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवून विजय संपादन केलेला आहे .तसेच नगर परिषदेत शिवसेना गटनेते पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.त्यांच्या या पक्ष कार्याची दखल घेऊन शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा ना एकनाथ भाई शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आदेश देत संदिप लहाने यांच्यावर आता शहरा सोबतच सेलू तालुक्यात शिवसेनाप्रमुखांचे तसेच धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार तळा गाळापर्यंत पोहचवून व शिव सैनिकांचे जाळे वाढवून पक्ष वाढीची जबाबदारी सोपवली आहे.पक्ष नेतृत्वाने आपल्यावर विश्वासाने टाकलेली जबाबदारी आपण पूर्ण करून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्या साठी तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना घरोघरी पोहचविण्यासाठी कटिबद्ध राहुत व पक्ष नेतृत्वाच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही .अशी ग्वाही संदीप लहाने यांनी या निवडीनंतर बोलतांना व्यक्त केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page