Friday, December 12, 2025
HomeParbhani“धीर सोडू नका.. आत्महत्या करू नका.. हिंमतीने लढायचं!” — उद्धव ठाकरे यांचा...
spot_img

“धीर सोडू नका.. आत्महत्या करू नका.. हिंमतीने लढायचं!” — उद्धव ठाकरे यांचा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्मविश्वासाचा संदेश.

“धीर सोडू नका.. आत्महत्या करू नका.. हिंमतीने लढायचं!” — उद्धव ठाकरे यांचा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्मविश्वासाचा संदेश.

Jyotsna Wankhede: मराठवाडा संवाद दौऱ्याच्या चौथ्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथे शेतकऱ्यां शी थेट संवाद साधला. उन्हाच्या तडाख्यात, वाढत्या खर्चात आणि बाजारभावातील अनिश्चिततेत जगणाऱ्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवादात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींना शब्द दिला आणि त्यांना आत्मविश्वासाने उभं राहण्याचं आवाहन केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जर डगमगला, तर समाजच डगमगेल. त्यामुळे कुणीही खचायचं नाही, धीर सोडायचा नाही, आत्महत्या करायची नाही तर हिंमतीने लढायचं. आपल्या हातात ताकद आहे, जिद्द आहे आणि श्रमाची खरी शक्ती आहे. या शक्तीचा वापर करून आपण परिस्थिती बदलू शकतो.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थित शेतकऱ्यां च्या चेहऱ्यावर समाधान, आत्म विश्वास आणि नवी उमेद दिसून आली.ढेंगळी पिंपळगाव आणि परिसरातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून विविध समस्यांनी त्रस्त आहेत. पावसा चा अनियमितपणा, वाढते खत-बियाण्यांचे दर, पिकविमा योजना अपुऱ्या ठरणं, आणि बाजारभाव यामुळे त्यांचं आर्थिक गणित बिघडले आहे. या सर्व समस्यांची सविस्तर चर्चा उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी शेतकऱ्यांचे अनुभव ऐकून घेतले व शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू बघितले आणि स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. केवळ आश्वासनांनी नव्हे, तर कृतीतून बदल घडविण्याची जबाबदारी आपण घेतली आहे.”यावेळी उद्धवसाहेबांनी शासनावर टीका करत म्हटलं की, “आज शेतकऱ्याला केवळ कर्जमाफी, न्याय्य भाव आणि स्थिर धोरण हवं आहे. शेतकऱ्याच्या श्रमाची किंमत मिळाली, तर तो पुन्हा नव्याने उभा राहील. मराठ वाड्याच्या मातीतील शेतकरी हार मानणारा नाही, तो लढणारा आहे, जिद्दी आहे.” त्यांच्या या शब्दांना सभेत उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.या संवाद सभेला शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. ढेंगळी पिंपळगाव आणि परिसरातील लोकांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत मोठ्या उत्साहात केलं. गावात  जयघोषाचा गजर झाला. “उद्धवसाहेब आगे बढ़ो, आम्ही तुमच्या सोबत आहोत!” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

सभेच्या अखेरीस उद्धवसाहेबांनी गावातील ज्येष्ठ शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांना प्रोत्साहन दिलं. त्यांनी सांगितलं की, “लढाई ही न्यायासाठी आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या जगण्या साठी आपण एकत्र राहून संघर्ष करणार आहोत.” त्यांच्या या भाषणाने उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झालं.या भेटीमुळे केवळ राजकीय दौऱ्याचं औपचारिक स्वरूप नव्हे, तर एक भावनिक आणि प्रेरणादायी संवाद साकारला. उद्धव ठाकरे यांच्या भेटीने शेतकऱ्यांच्या मनात आत्मविश्वास, आशा आणि नव्या उभारीचा संचार झाला आहे. मराठवाड्याच्या मातीतील शेतकरी आता डगमगणार नाही — तो पुन्हा नव्याने उभा राहील, लढेल आणि जिंकेल, हेच या संवादाचं सार ठरलं आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page