वन्दे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्या बद्दल भारत माता पूजन.
देवगिरी नागरी सहकारी बँक शेड्युल्ड बँक शाखा सेलू च्या वतीने वंदे मातरम् गीताचा कार्यक्रम संपन्न.
Jyotsna Wankhede: देवगिरी नागरी सहकारी बँक शेड्युल्ड बँक शाखा सेलू च्या वतीने वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्या बद्दल आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ स्वयंसेवक हरिभाऊ काका चौधरी हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय रेल्वे बोर्ड नॉर्थ सेंट्रलचे झेड आर यू सी सी सदस्य डॉ. शिवाजी शिंदे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करून झाली.यावेळी शाखाधिकारी विश्वास देव यांनी आपल्या प्रास्ताविकात देवगिरी नागरी सहकारी बँक ही नेहमीच देशाच्या आर्थिक सुबत्ते बरोबर सामाजिक संवेदना दाखवत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते.समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन बँकेच्या आर्थिक विकासाबरोबर सामाजिक सांस्कृतिक उपक्रम घेऊन ग्राहकांना विविध सोयी सुविधा विषयी माहिती देण्याचे कार्य करत असते. आज वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाले देशभरात सर्व शासकीय आणि खासगी कार्यालयात या गीताचे सामूहिक पठण करण्यात आले आहे.याच अनुषंगाने सेलू शाखेच्या कार्यालयात कार्यक्रम आयोजित केला आहे असे नमूद केले.प्रमुख पाहुणे डॉ. शिवाजी शिंदे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रगान वंदे मातरम् गीताचा इतिहास समोर ठेवला स्वतंत्र पूर्व काळात वंदे मातरम् गीत म्हणजे तरुणांना देशभक्ती आणि राष्ट्र प्रेम जागृती निर्माण करण्याच एक प्रेरणा स्रोत गीत होते. बक्किमचंद चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्या काळात अनेकांना स्फूर्ती प्रेरणा देत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ स्वयंसेवक श्री हरिभाऊ काका चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वंदे मातरम् हे गीत हे एक गीत नसून ते भारतमातेचे गौरव गीत होते या गीतामुळे भारताचा गौरवशाली इतिहास समोर येत होता.ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैनिकांना हर हर महादेव म्हटले की एक मोठी ऊर्जा ताकद मिळत होती तशी ऊर्जा वंदे मातरम् या गीताची होती या गीतामुळे अनेक तरुणांनी प्रेरणा घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे कार्य केले आहे आणि आज या निमित्ताने आपण एकत्र येऊन आपल्या सर्व हुतात्म्यांच्या स्मृतीस अभिवादन करून येणाऱ्या नवीन पिढीला वंदे मातरम् या गीताचे महत्त्व समजावे म्हणून आज आपण सामूहिक पठण करत आहोत. सच्चिदानंद डाखोरे सर व सौ.हेमलता देशमुख आणि विद्यार्थी यानी हार्मोनियम वर वन्दे मातरम् गीत सादर केले. या प्रसंगी महिला मंडळ सेलूच्या अध्यक्षा ललिता गिल्डा ताई, श्रीमती करुणा बागले,जन कल्याण बँकेचे अध्यक्ष सुधीर चौधरी, उपेंद्र बेल्लूरकर साहेब, पत्रकार, श्रीपाद कुलकर्णी साहेब, नागेश कान्हेकर, आदी पुरुष आणि महिला उपस्थित होत्या.आभार बँकेचे अधिकारी अमोल बोरीकर यांनी मानले.