Tuesday, December 9, 2025
HomeParbhaniअतिवृष्टी अनुदान यादीत नाव आहे पण ekyc मुळे शेतकऱ्यांना मनस्ताप.
spot_img

अतिवृष्टी अनुदान यादीत नाव आहे पण ekyc मुळे शेतकऱ्यांना मनस्ताप.

अतिवृष्टी अनुदान यादीत नाव आहे पण ekyc मुळे शेतकऱ्यांना मनस्ताप.

 
सेलू तहसील कार्यालयातील सर्व्हर डाऊनमुळे अडचणी;यादी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चुकी शेतकऱ्यांना त्रास..
Jyotsna Wankhede:अतिवृष्टी अनुदानासाठी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा सर्वे  करताना आलेल्या तांत्रिक व शेतकऱ्यांच्या नावाच्या त्रुटींमुळे शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे अनुदान पडलीच नाही त्यामुळे शेतकरी अतिवृष्टी च्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत सेलू तहसील परिसरातील अनेक शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनुदानासाठी पात्र असूनही अनेक शेतकऱ्यांची नावे यादीत दिसत नाहीत किंवा चुकीची माहिती नोंदवली गेल्याने त्यांचे अर्ज प्रलंबित राहिले आहेत.शेतकरी सांगतात की, तहसील कार्यालयात गेल्यावर सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने तासन्तास रांगेत थांबूनही काम होत नाही. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या माहिती नोंदीमुळे शेतकऱ्यांचे अर्ज ‘त्रुटीमध्ये’ गेले असून,तर काहीचे नावे अनुदान यादी मध्ये जाहीर झालेले असताना ते दुरुस्ती यादी मध्ये आले आहेत तर काही शेतकऱ्यांचे फार्मर आयडी असतांना सुध्दा त्यांना नाहक eykc पेंडिंग यादी मध्ये टाकले आहे अश्या सर्व शेतकरी बांधवांना ते दुरुस्त करण्यासाठी पुन्हा-पुन्हा चकरा माराव्या लागत आहेत.“आम्ही दररोज तहसीलला जातो, पण सिस्टीम सुरू होत नाही. कोणी सांगतं सर्व्हर डाऊन आहे, तर कोणी म्हणतं त्रुटी दाखवतंय. शेवटी नुकसान आमचंच होतं,” असे एका शेतकऱ्याने सांगितले. स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले की, राज्यस्तरीय सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण असल्याने डेटा अपडेट करण्यात अडथळा निर्माण होत आहे. संबंधित विभागाला तक्रार पाठविण्यात आली असून, लवकरच समस्या दूर केली जाईल, असे अधिकारी म्हणाले.
दरम्यान, शेतकरी यांनी प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन, त्रुटीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page