निवडणूकीतून ते दाखवून सुद्धा दिलंय _उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परभणीच्या सभेतून उद्धव ठाकरे यांना जोरदार टिका.
Jyotsna Wankhede: दि. 12 नोव्हें. खरे दगाबाज कोण आहेत, हे सर्व जनतेस चांगलचं माहिती आहे. निवडणुकीतून ते जनतेने दाखवून दिले आहे अशी खरमरीत टिका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली.उपमुख्यमंत्री शिंदे यांची आज बुधवार रोजी परभणीतील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार हरिभाऊ लहाने, जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, जिल्हाप्रमुख विशाल कदम, प्रवक्ते श्रीमती ज्योती वाघमारे, भास्करराव लंगोटे,महानगर प्रमुख माणिक पोंढे, गीता सूर्यवंशी, सखुबाई लटपटे, आप्पाराव वावरे,राजू कापसे, प्रवीण देशमुख, शेख शब्बीर, प्रभाकर कदम,सचिन पाटील, यांच्यासह अन्य पदाधिकारी व्यासपीठावर विराजमान होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणा तून ठाकरे यांचा नामोल्लेख न करता कडाडून टीका केली.
आपण मुख्यमंत्री होतात,त्यावेळी कधीही घराबाहेर पडला नाहीत. सर्वसामान्य शेतकऱ्यांसह जनते च्या अश्रू पुसण्याकरता धावून गेला नाहीत. कोरोना सारख्या आपत्तीच्या काळात सुद्धा घरा बाहेर पडण्याऐवजी फेसबुक लाईव्ह होता. अशी टिका करीत तेव्हाही आम्ही जनतेत फेस टू फेस होतो. संकटकाळात सर्व सामान्यांचे अश्रू पुसत होतो, या उलट आपल्या हातात सत्ता होते तेव्हा कधीही आपण शेतकऱ्यां सह सर्वसामान्य जनतेला काही ही दिलं नाही. उलट अख्खी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधणी, हिंदूत्वं बाजूला ठेवलं, धनुष्यबाण गहाण ठेवला. त्यावेळी खरे दगाबाज कोण आहे, हे सर्व सामान्य जनतेला चांगलंच कळलं .विधानसभा निवडणुकीतून जनतेने ते दाखवून सुद्धा दिलं. आपल्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कमपणे ताकद उभी करीत याच जनतेने विधानसभे च्या लढविलेल्या 80 जागांपैकी. 60 जागावर यश दिलं . त्याच वेळी जनतेने आपल्या या कृती तून विरोधकांना जागा दाखवून दिली. असे शिंदे यांनी नमूद केले. आपण सत्तेवर व सत्ते बाहेर असताना सुद्धा सातत्याने नकारात्मक राजकारण केले. सर्व विकास प्रकल्प बंद पाडले, सण-उत्सव बंद केले. त्याद्वारे आपल्या पोटातील जळजळ मळमळ दाखवून दिली. परंतु आम्ही सत्तेवर आल्याबरोबर रखडलेल्या विकास कामांना चालना दिली. सणवार -उत्सव उत्साहाने सुरू केले असे शिंदे यांनी म्हटले . प्रत्येक गोष्टीत खोडा घालण्याचा प्रयत्न, सातत्याने अपप्रचार करीत सामान्य माणसाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न हेच आता विरोधकांचे सूत्र राहिले आहे. यातून त्यांचा बेईमानपणा दिसून येतो आहे असे ते म्हणाले.2014 पासून राज्यसह केंद्रात महायुती ने मोठ्या प्रमाणावर महत्वकांक्षी निर्णय घेतले आहेत, सर्व क्षेत्रात विकासाच्या प्रक्रियेस मोठा वेग दिला आहे, सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू ठरवून त्याच्या विकासा चे सर्वाअर्थाने प्रयत्न चालवले आहेत, त्याचे चांगले परिणाम दिसून येऊ लागलेआहेत.सामान्य जनतेला त्याद्वारे दिलासा मिळतो आहे.नैसर्गिक आपत्तीत, संकट काळात सुद्धा शेतकऱ्यां सह सर्वसामान्य जनतेच्या पाठी शी हे सरकार भक्कमपणे उभे राहिले आहे. भविष्यात सुद्धा हे सरकार सातत्याने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वांगीण विकासाचे प्रयत्न निश्चितपणे जलदगतीने करत राहील. अशी ग्वाही शिंदे यांनी भाषणातून दिली.परभणीतील विकास प्रश्नांनाही सरकार निश्चितपणे चालना देईल. भूमिगत गटार योजना, समांतर पाणी पुरवठा योजना, रस्ते विकासाकरता भरघोस निधी, उजळंबा येथील नवीनऔद्योगिक वसाहत, अहिल्याबाई होळकर स्मारक, नागोबा मंदिराचा जीर्णोद्धार,महादेव मंदिराचे हस्तांतरण व जीर्णोद्धार वगैरे बाबत हे सरकार ठोस निर्णय घेईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सातही नगरपालिकेत कार्यकर्त्यां नी भक्कमपणे मोर्चे बांधणी करीत भगवा झेंडा फडकवावा असे आवाहन शिंदे यांनी भाषणातून केले. आपण सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहू अशी ग्वाही देऊन शिंदे यांनी जिल्हाप्रमुख भरोसे हे भरोश्याचे आहेत,आपण यांच्या पाठीशी आपण सर्व ताकदीनिशी उभे आहोत, पुढील निवडणुकी तून ते निश्चितपणे विधानसभेत दाखल होतील असा विश्वास व्यक्त केला.