यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर असताना आमदार श्री सुधाकर अडबाले यांनी आर्णी तालुक्यातील विविध शाळा तसेच महाविद्यालयांना सदिच्छा भेट
Jyotsna Wankhede:
श्री. दत्त प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ, आर्णी द्वारा संचालित स्व. राजकमलजी भारती कला वाणिज्य तथा श्रीमती सुशीलाबाई आर. भारती विज्ञान महाविद्यालय, आर्णी, श्री महंत दत्तराम भारती विद्यालय, गांधीनगर (आर्णी), श्री. द. मा. भारती माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय (मुख्यशाखा), आर्णी तसेच श्री. गुरुदेव विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय जवळा (ता. आर्णी), स्व. भारतसिंह ठाकुर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जवळा (ता. आर्णी), राष्ट्रीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा, लोणी, देवराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक, आर्णी येथे भेट देत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री. दिलीप कडू यांच्या प्रचारार्थ शिक्षक, प्राध्यापकांनी संवाद साधला.
शिक्षक चळवळीत नवनिर्मितीचा ध्यास घेणारे श्री. दिलीप कडू यांच्या पाठीशी शिक्षकांनी एकदिलाने उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक–शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा करून आमदार सुधाकर अडबाले यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महामंडळाचे सदस्य श्री. आनंद मेश्राम, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री. पवन बन, जिल्हा कार्यवाह श्री. रामकृष्ण जीवतोडे, जिल्हा संघटक श्री. हेडाऊ सर, श्री. कोटावार सर तसेच महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक–शिक्षकेत्तर मोठ्या संख्येने उपस्थित होते.