Sunday, May 31, 2026
HomeYeotmalयवतमाळ जिल्ह्यातील ६० प्रकरणे 'ऑन द स्पॉट' निकाली समस्या निवारण सभा
spot_img

यवतमाळ जिल्ह्यातील ६० प्रकरणे ‘ऑन द स्पॉट’ निकाली समस्या निवारण सभा

यवतमाळ जिल्ह्यातील ६० प्रकरणे ‘ऑन द स्पॉट’ निकाली समस्या निवारण सभा

ज्योत्स्ना वानखेडे: जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील कार्यरत शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ सहविचार सभा २१ जानेवारी जानेवारी रोजी शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालय, जि. प. यवतमाळ येथे पार पडली. तीन तास चाललेल्‍या सहविचार सभेत आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने ६० प्रकरणे ‘ऑन द स्पॉट’ निकाली काढण्यात आली.
सभेत माध्यमिक विभागातील प्रलंबित विविध सामुहिक व वैयक्‍तिक विषयांवर चर्चा करण्यात आली. २०१५-१६ कार्यकाळातील  जिपीएफ, भविष्य निर्वाह निधी, अर्जित रजा रोखिकरण बिल, एन.पी.एस खात्याबाबत तसेच थकबाकीचे देयके, वरिष्ठ श्रेणी प्रस्ताव, वैद्यकीय देयके त्वरित निकाली काढण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्‍या. प्रलंबित प्रकरणे आमदार अडबाले यांनी तात्काळ काढण्यास सांगून १ मुख्याध्यापक मान्‍यता, २ वरिष्ठ श्रेणी व ५७ वैद्यकीय देयके ‘ऑन दि स्पॉट’ मान्‍यतेचे पत्र देण्यात आले. शिक्षकांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्यासाठी आमदार अडबाले यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच भविष्य निर्वाह निधी पावत्‍या ३१ मार्च २०२६ पर्यंत न मिळाल्यास जिल्हा कार्यकारिणी १ एप्रिल पासून शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्‍याचे जिल्हाध्यक्ष पवन बन यांनी सभेत सांगितले
सदर सभेला शिक्षणाधिकारी (माध्य.) श्री. किशोर पागोरे, उपशिक्षणाधिकारी श्री गोडे, वेतन पथक अधीक्षक श्री. वानखडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष श्री. अरविंद देशमुख, अमरावती शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्री. दिलीप कडू, वर्धा जिल्‍हा कार्यवाह श्री. महेंेद्र सालंकार, यवतमाळ जिल्‍हाध्यक्ष पवन बन,  जिल्हा  कार्यवाह श्री. रामकृष्ण जीवतोडे, महामंडळ सदस्‍य श्री. आनंद मेश्राम, श्री. मनोज जिरापुरे, श्री. मुरलीधर धनरे, मंगला वडतकर, श्रावणसिंग वडते, श्याम बोढे, अशोक आकूलवार, विजयराव विसपुते, गुलाब सोनवणे, श्रीकांत अंदुरकर, साहेबराव धात्रक, सुरेंद्र कडू, भूमन्ना भूमकंटीवार, भूपेंद्र देरकर, संतोष हेडाऊ, उमाकांत राठोड, नागोराव चौधरी, डॉ. इर्शाद खान, इमरान सर, विनोद मंगाम, गुंडेवाड सर, नितीन गावंडे व संघटनेचे इतर पदाधिकारी तसेच समविचारी संघटनांचे पदाधिकारी व समस्याग्रस्त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page