Tuesday, December 9, 2025
HomeElectionनागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार यादीचा सुधारीत पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
spot_img

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार यादीचा सुधारीत पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार यादीचा सुधारीत पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

चंद्रपूर( जीमाका): भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याकरीता सुधारीत कार्यक्रम घोषित केला आहे. सदर पुनरिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
1) मतदार नोंदणी अधिनियम, 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सुचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 30 सप्टेंबर 2025, 2) कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्ण प्रसिध्दी 15 ऑक्टोबर 2025 रोजी, 3) वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी 25 ऑक्टोबर 2025 रोजी, 4) प्रकरणपरत्वे नमुना 18 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा दिनांक 6 नोव्हेंबर 2025, 5) हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई 28 नोव्हेंबर, 6) प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी 3 ‍डिसेंबर रोजी, 7) दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी (मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 12 अंतर्गत) 3 ते 18 डिसेंबर 2025 पर्यंत, 8 ) दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे 5 जानेवारी 2026 रोजी आणि 9) मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी 12 जानेवारी 2026 रोजी करण्यात येईल.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत दावे व हरकती 3 ते 12 डिसेंबर 2025 या कालावधीत स्वीकरण्यात येणार आहे. आपले नाव पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट करण्याकरीता पात्र असलेल्या पदवीधर मतदारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page