Sunday, September 13, 2026
spot_img
HomeFestivalsपर्यावरण पूरक गणेश मंडळांना आकर्षक बक्षीस.

पर्यावरण पूरक गणेश मंडळांना आकर्षक बक्षीस.

पर्यावरण पूरक गणेश मंडळांना आकर्षक बक्षीस.

श्रेयश वानखेडे:
चांदा इको केअर फाउंडेशन तर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरण पूरक व सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून आकर्षक देखावे व कार्य केल्यास त्यांचा जाहीर सन्मान करून त्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येईल.
दिनांक 27 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवा प्रसंगी चंद्रपुरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी “पर्यावरण पूरक गणेश मंडळ स्पर्धा” यात भाग घेण्याकरिता ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी 31 ऑगस्ट पर्यंत करू शकता. नोंदणी शुल्क 100 रुपये राहील.
पर्यावरण पूरक सार्वजनिक गणेश मंडळांना बक्षीस नियम
1) गणेश मूर्ती मातीची (शाडू) असावी.
2) देखावा हा पर्यावरण पूरक संदेश देणारा असावा.
3) गणेश मंडळाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविले असावे.
4) गणेश मंडळातील परिसरात मंडळातर्फे सामाजिक दायित्वाचे कार्य केलेले असावे.
5) परिसरातील बालकांच्या कला/ क्रीडा गुणाच्या विकासाकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले असावे.
संपर्क येथे करावा.
प्रमोद केळझरकर लॉन्ड्री शॉप रामनगर चंद्रपूर, असे चांदा ईको केअर फाउंडेशन चे अध्यक्ष विवेक आंबेकर, उपाध्यक्ष अशोक दुर्गे, सचिव पद्माकर मोरे, सहसचिव अविनाश रेशीमवाले, कोषाध्यक्ष प्रमोद केळझरकर व अतुल अल्याडवार, नितीन फुलझले, अतुल देवतळे , संजय रागनकर,  अरविंद बनकर, आनंद निरंजने, प्रदीप देवईर, सतीश पेठे  आदींनी कळविले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page