Jyotsna Wankhede:
भिक्षु निवास पाली विद्यालय आणि बुद्ध विहार, बल्लारपुरच्या वतीने २५ नोव्हेंबर २०२५ रोज मंगळवारला भिक्षु निवास पाली विद्यालय आणि बुद्ध विहार, विद्यानगर, बल्लारपुर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आचार्य भदंत वण्णास्सामी महाथेरो, अरूणांचल प्रदेश ( ह. मु. नागपुर) होते. सकाळी ठिक ११.०० वाजता कार्यक्रमाला सुरूवात झाली. सर्वप्रथम ११.०० वाजता उपस्थित भिक्षु संघास भोजनदान देण्यात आले. त्यानंतर लगेच परित्राण पाठ झाले. दुपारी ठिक १२.१५ वाजता मार्गदर्शनाला सुरूवात झाली. आचार्य भदंत वण्णास्सामी महाथेरो यांनी आपल्या मार्गदर्शनात श्रद्धा विकसीत करणे शिलाचे न चुकता पालन करणे व समाधी (ध्यानाचा) अभ्यास करणे यावर विशेष भर दिला. तसेच सब्ब पापस्स ——- संपदा ——– एतं बुध्दानं सांसनं. हे ही सविस्तर समजावुन सांगीतले.
कार्यक्रमाचे संचालन धम्ममित्र भास्कर भगत यांनी केले. आचार्य भदंत वण्णास्सामी महाथेरो यांचे पुष्पगुच्छ देवुन पार्वताबाई मोटघरे तसेच संस्थेचे संचालक ताराचंद थुल व अध्यक्ष तुळशिदास खैरे यांनी स्वागत केले. उपस्थित भिक्षु संघास दान देवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपासक – उपासिका उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अशोक सुपारे, प्रकाश देवगडे, जयदास भगत, ताराचंद थुल, तुळशिदास खैरे गोकुल वाघमारे, रवि खोब्रागडे, निता कोरडे, विद्या भगत, संघमित्रा रंगारी, बाळु महेशकर, राहुल रावळे यांनी विशेष परिश्रम घेतले.