Friday, September 11, 2026
spot_img
HomeNagpurमहालेखाकार पेन्शन विभागातील गलथान, भ्रष्टाचारी कारभारची सखोल चौकशी ! मान. श्रीमती सुहासिनी...

महालेखाकार पेन्शन विभागातील गलथान, भ्रष्टाचारी कारभारची सखोल चौकशी ! मान. श्रीमती सुहासिनी गोतमारे,आय.ए.ॲड ए.एस,महालेखाकार (द्वितीय)

महालेखाकार पेन्शन विभागातील गलथान, भ्रष्टाचारी कारभारची सखोल चौकशी ! मान. श्रीमती सुहासिनी गोतमारे,आय.ए.ॲड ए.एस,महालेखाकार (द्वितीय)

खाजगी शाळा शिक्षक संघाने महालेखाकार द्वितीय, पेन्शन विभाग,पी आर सात नागपूर  येथील गलथान, भ्रष्टाचारी कारभार, सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी यांना होणाऱा त्रासाची दखल घेवुन येथिल अनियमिततेची दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ ला लेखी तक्रार केली.
यात शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपुर पत्र क्रमांक पेन्शन/१७५३/२०२५ दिनांक ६ जुन २०२५ यात श्री विजय नानाजी बोंडे,पिपिओ क्र ११२४०१०४०४९९९, दिनांक २३ डिसेंबर २०२४ यांचे पेन्शन प्रकरणात विजय नानाजी बोंडे एवजी विजय नानाजी भोंडे करण्यात आले दुरुस्ती चार महिन्यांनंतर करण्यात आली यासाठी संबंधित कर्मचारी यांना कोषागार कार्यालय पेन्शन साठी महालेखाकार द्वितीय यांचेकडे एकशे साठ किलोमीटर अंतरावरून यावे लागले तसेच महालेखाकार कार्यालय येथे एक तास थांबावे लागले कारण कर्मचारी बाहेर होते, पेन्शन उशिराने लागु झाली.
       तसेच  विकास विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय शंकरपूर तालुका: चिमुर जिल्हा: चंद्रपूर येथून सेवानिवृत्त झालेले श्री. पितांबर तुळशीराम वांढरे वरिष्ठ लिपिक यांच्या पेन्शन केस सूचनापत्र मध्ये त्यांचे नाव “पितांबर तुलशिराम वांढरे” [ PITAMBAR TULSHIRAM WANDHARE]  ऐवजी “पितांबेर तुलशिराम वांढरे” [ PITAMBER TULSHIRAM WANDHARE] करण्याचा उपक्रम या कार्यालयाने केला होता. त्यांना संबंधित विभागात पैशाची रूपये पाच हजार मागणी केल्याचे तक्रारीत नमूद केले, संबंधित अधिकारी यांनी तक्रारी नंतर संबंधितांना एक महीना लागेल, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे पत्र आणण्यासाठी निर्देश दिले दिनांक 31 जुलै 2025 रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांना आतापर्यंत लाभ मिळाला नाही.
        महालेखाकार द्वितीय नागपूर यांचेकडे पेन्शन प्रकरण कार्यालय सादर करिता असताना सेवा पुस्तक, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक दिले जातात अश्या नावात चुका अपेक्षित नाही,हा छुपा भ्रष्टाचार आहे, प्रत्येक वेळी भ्रष्टाचार निर्मूलन यांचेकडे तक्रारी दाखल करणे योग्य वाटत नाही, संबंधित विभागाची बदनामी होते असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
       पी आर सात या संबंधित विभागात सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे आवश्यक आहे, कर्मचारी बाहेर जातात व एक ते दोन तास तक्रार करते कर्मचारी यांना थांबावे लागते, ही बाब योग्य नाही असे स्पष्ट करण्यात आले मान.श्रीमती सुहासिनी गोतमारे,आय.ए.ॲड ए.एस यांनी चौकशी करण्याचे आदेश व खाजगी शाळा शिक्षक संघाच्या तक्रारीची दखल घेतली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page