Friday, September 11, 2026
spot_img
HomePolice*चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाची माहे ऑगस्ट 2026 मधील अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम;*...

*चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाची माहे ऑगस्ट 2026 मधील अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम;* *कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई*

*चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाची माहे ऑगस्ट 2026 मधील अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम;*

*कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने माहे ऑगस्ट 2026 या कालावधीत अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्यात व्यापक मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान दारूबंदी, जुगार, गोवंश तस्करी, अमली पदार्थ (NDPS), मकोका (MCOCA), रेती चोरी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
*अवैध धंद्यांविरुद्ध विशेष कारवाईची ठळक आकडेवारी :*
ऑगस्ट महिन्यात अवैध धंद्यांशी संबंधित एकूण 378 गुन्हे दाखल करून 459 आरोपींना अटक करण्यात आली असून, 80,68,605/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
– *दारूबंदी व हातभट्टी दारू:* दारूबंदी कायद्यांतर्गत 355 गुन्हे उघडकीस आणून 50,31,130/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच हातभट्टी दारूवरील 5 कारवायांमध्ये 2,14,500/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
– *जुगार कायदा:* 88 प्रकरणांमध्ये धडक कारवाई करत 1,05,11,611/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
– *अवैध जनावरांची वाहतूक:* 18 कारवायांमध्ये 179 जनावरांची सुटका करण्यात आली आणि 31 वाहनांसह एकूण 1,96,26,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
– *अमली पदार्थ विरोधी कारवाई (NDPS):* 57 कारवायांमध्ये एकूण 10,42,000/- रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यामध्ये 10,01,095/- रुपये किमतीचा 20 किलो 99 ग्रॅम गांजा आणि 42,650/- रुपये किमतीचे 4 ग्रॅम 650 मिग्रॅ एम.डी. (MD) जप्त करण्यात आले.
– *रेती चोरी:* 8 प्रकरणांमध्ये 1,57,81,200/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
– *सुगंधी तंबाखू व कोटपा (COTPA):* प्रतिबंधित सुगंधी तंबाखूच्या 11 गुन्ह्यांमध्ये 19,86,513/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच कोटपा कायद्यांतर्गत 697 प्रकरणांत 1,39,400/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
– *हत्यार कायदा:* 9 कारवायांमध्ये 7,98,100/- रुपयांची बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यात आली. यामध्ये 2 भरमार बंदुका, 5 पिस्तूल, 26 जिवंत काडतुसे, 1 तलवार, 1 चाकू व 1 सत्तूर यांचा समावेश आहे.
*प्रतिबंधक कारवाई (Preventive Action)*
जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कडक पावले उचलण्यात आली:
– *मकोका (MCOCA):* 3 कारवाया
– *तडीपार:* 6 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई
*वाहतूक नियमन व कारवाई (Traffic Enforcement)*
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध एकूण 22,102 प्रकरणे दाखल करून 1,90,89,750/- रुपयांचा दंड आकारण्यात आला.
– विनाहेल्मेट: 5,533 प्रकरणे, : सीटबेल्ट न लावणे: 1,108 प्रकरणे
– ट्रिपल सीट: 2,006 प्रकरणे : वाहन चालवताना मोबाईलचा वापर: 586 प्रकरणे
– मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे (D.D.): 288 प्रकरणे
– चुकीच्या बाजूने वाहन चालवणे: 47 प्रकरणे : अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे: 14 प्रकरणे
– मोटार वाहन कायदा कलम 122: 2,046 प्रकरणे
– पोलीस दलाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे प्राणघातक अपघातांत (-11) घट झाली असून अपघाती मृत्यूचे प्रमाण 22 ने (-9.12%) कमी झाले आहे.
*महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल व चोरीचा मुद्देमाल हस्तगत*
– *जबरी चोरी (चेन स्नॅचिंग):* 4 गुन्हे उघडकीस आणून 1,53,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
– *घरफोडी:* 12 गुन्हे उघडकीस आणून 4,84,525/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
– *चोरी व मोटारसायकल शोध:* चोरीचे 37 गुन्हे उघडकीस आणून एकूण 74,29,460/- रुपयांचा ऐवज जप्त केला. यामध्ये 3,70,000/- रुपये किमतीच्या 10 चोरीच्या मोटारसायकलींचा शोध घेऊन त्या हस्तगत करण्यात आल्या.
*अपहृत व हरवलेल्या व्यक्तींचा यशस्वी शोध*
मानवी दृष्टिकोनातून विशेष शोधमोहीम राबवून पोलिसांनी एकूण 95 हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेतला:
– 16 मुली व 5 मुले
– 48 महिला व 26 पुरुष
*न्यायालयात उत्कृष्ट पैरवी व दोषसिद्धी (Convictions)*
पोलीस तपास अधिकारी व पैरवी अधिकाऱ्यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे पो.स्टे. ब्रम्हपुरी (अ.क्र. 48/23, अ.क्र. 437/22), पो.स्टे. नागभीड (अ.क्र. 233/24), पो.स्टे. चंद्रपूर शहर (अ.क्र. 201/23) गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना माहे ऑगस्टमध्ये सक्षम शिक्षा सुनावण्यात आली:
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंद्यांविरोधातील ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र गतीने सुरू राहील.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page