खाजगी शाळा शिक्षक संघाचे धरणे आंदोलनात संचमान्यता १५ मार्च २०२५ चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी !
Jyotsna Wankhede: खाजगी शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी खाजगी शाळा शिक्षक संघ सोमवार, ८ डिसेंबर रोजी नागपूर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
संघाने दिलेल्या माहितीनुसार, संचमान्यता, अनुकंपा नियुक्ती, शैक्षणिक पात्रता नियम, जुन्या पेन्शन योजनेचे लाभ, भविष्य निर्वाह निधी, सीबीएसई/आयसीएसई शाळांच्या सुट्या, कोरोना काळात मृत्यू पावलेल्या शिक्षक परिवारास अनुदान, वेतन प्रकरणे, टीईटी सूट, तसेच वेतनेतर अनुदान या अनेक मुद्द्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी शिक्षक संघाची प्रमुख मागणी करण्यात आली..
अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेला गती देऊन अर्जांना मान्यता व शालार्थ आयडी प्रदान करावेत.
शिक्षणाधिकारी पदासाठी पदवी + बी.एड ही शैक्षणिक पात्रता बंधनकारक करावी.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त प्रशिक्षित व अप्रशिक्षित शिक्षक हा विचार न करता, भविष्य निर्वाह निधी खाती सुरू ठेवावी
सीबीएसई/आयसीएसई शाळांसाठी राज्य शासनाच्या सुट्टी नियमावलीनुसार स्पष्ट मार्गदर्शक सूचना द्याव्यात.
कोरोना काळात मृत्यू पावलेल्या,मयत रामदास काकडे, हिंगणा -नागपूर व दिपक सोमनकर, चामोर्शी-गडचिरोली शिक्षकांच्या वारसांना ₹50 लाखांचे सानुग्रह अनुदान तातडीने द्यावे.
खाजगी शाळांच्या वेतनेतर अनुदानात होणारा विलंब दूर करून ते सातव्या वेतन आयोगानुसार देण्याचा निर्णय करावा.
आंदोलनात सर्वश्री माजी आमदार नागोराव गाणार,प्रमोद रेवतकर, प्रेमलाल मलेवार, लोकपाल चापले, विजय नंदनवार, पुरूषोत्तम टोंगे, किशोर दहेकर, पवन नेटे, प्रदिप मोतीरामानी, रितेश कुलसुंगे, ममता बियाला, तेजराम बांगडकर,आदित्य कामडे, कुमुद बालपांडे, आशिष टिपले,परसराम शेंडे,सौ.मिनाक्षी रामटेके, ज्ञानेश्वर नागमोते, एकनाथ वैद्य, प्रिती बोरकर, नलिनी मसराम, प्रमोद कुंभारे, वसंतराव थाटे, संगीत चहांदे, मिनाक्षी भगत, विद्या मोरे, तनुश्री रंगारी, रेखा ठोंबरे, रेखा ठाकरे, प्रिती बोरकर, ,धनराज मुनघाटे, होमचंद वंजारी, रहमतुल्लाह खान, विजय आगरकर, पितांबर गायधने, ज्योती सुर्यवंशी यांसह अनेक पदाधिकाऱी व शिक्षक-कर्मचारी मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी होते.