Monday, April 20, 2026
HomeLekhस्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे अर्ज भरून शेतकऱ्यांसाठी आत्मसन्मानाची कर्जमुक्ती...
spot_img

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे अर्ज भरून शेतकऱ्यांसाठी आत्मसन्मानाची कर्जमुक्ती अर्ज चळवळ

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे अर्ज भरून शेतकऱ्यांसाठी आत्मसन्मानाची कर्जमुक्ती अर्ज चळवळ

शेतकऱ्यांच्या व्यथा, त्यांच्या हक्कांची लढाई आणि त्यांच्या आत्मसन्मानासाठी सुरू झालेली एक युगप्रवर्तक चळवळ इतिहासात अजरामर होणार आहे. देशोन्नतीचे संपादक प्रकाशजी पोहरे यांनी उभारलेले “शेतकरी कर्जमुक्ती अर्ज आंदोलन” हे केवळ सामाजिक उपक्रम नाही, तर भूमिपुत्र बळीराजासाठी सुरू झालेला संघर्षाचा नवा अध्याय आहे.
१४ मे या दिवशी, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या पावन दिनी, शेतकरी बांधवांनी कर्जमुक्तीसाठी अर्ज भरून शासकीय कार्यालयात सादर करावेत, असा ठाम संदेश प्रकाशजी पोहरे यांनी दिला आहे. हे केवळ आवाहन नाही, तर शेतकरी हा केवळ उपमेचा विषय नसून तोच खरा या देशाचा पोशिंदा आहे, या भावनेचा बुलंद आवाज आहे.
राजकीय व्यासपीठावर अनेकदा ‘शेतकरी’ हा शब्द केवळ भाषणातील आकर्षणासाठी वापरला जातो. पण प्रत्यक्षात त्यांच्या वेदना, हक्क आणि जीवनमरणाच्या संघर्षांबद्दल कुणीही जबाबदारी स्वीकारायला तयार नसतो. मात्र प्रकाश पोहरे यांचे नेतृत्व याला अपवाद आहे — त्यांचे प्रामाणिक, अभ्यासू आणि शेतकरीप्रिय व्यक्तिमत्त्व आज नव्या आशेचा किरण बनले आहे.
ही चळवळ कोणत्याही राजकीय चौकटीत बसणारी नाही, ही पक्षनिरपेक्ष आणि खरी शेतकरी केंद्रित चळवळ आहे. हे आंदोलन ही एक सुरुवात असली, तरी याचे भविष्य मोठे असून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारा निर्णायक टप्पा ठरणार आहे. ही केवळ एक आंदोलनात्मक लढत नाही, तर ही न्याययात्रा आहे — आणि या यात्रेला असे नेतृत्व हवे जे सत्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असेल.
प्रकाशजी पोहरे यांच्यासारखे विचारवंत आणि समर्पित नेतृत्व हेच आजच्या भारताला, विशेषतः बळीराजाला अत्यावश्यक आहे. त्यांनी उभारलेली कर्जमुक्ती अर्ज चळवळ ही शेतकऱ्यांसाठी आत्मसन्मानाने उभे राहण्याची सुवर्णसंधी आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन सुरू झालेला हा लढा, प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या जीवनात न्यायाची नवी पहाट घेऊन येईल.
“सत्तेच्या सिंहासनावर नव्हे, तर शेतकऱ्याच्या झोपडीच्या ओलसर मातीवरून नवी क्रांती उभी राहते.”
ही क्रांती सुरू झाली आहे… आणि तिचं भविष्य आपल्यासमोर उभं आहे.
१४ मे रोजी अर्ज भरून सादर करणे हे केवळ एक कर्तव्य नसून, आपल्या आत्मसन्मानाचा बुलंद आवाज आहे.
राहुल श्रीराम भोयर
 ब्रम्हपुरी, तालुका ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर
९४२१८१५११४
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page