Monday, September 14, 2026
spot_img
HomeChandrapurआ. सुधीर मुनगंटीवार यांची आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत १५ जानेवारी पर्यंत...

आ. सुधीर मुनगंटीवार यांची आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत १५ जानेवारी पर्यंत वाढवण्याची मागणी

आ. सुधीर मुनगंटीवार यांची आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत १५ जानेवारी पर्यंत वाढवण्याची मागणी

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती

Jyotsna Wankhede : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आधारभूत धान खरेदी नोंदणीची अंतिम तारीख १५ जानेवारी पर्यंत वाढवून देण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मुल, बल्लारपूर आणि पोंभुर्णा तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ही मागणी करण्यात आली आहे.

भाजपा किसान मोर्चाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बंडु गौरकार यांनी यासंदर्भात आ.सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले, निवेदनाची तात्काळ दखल घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. या निवेदनात चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात धान उत्पादन झाले असून धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय वाढल्याचे आ. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

सध्या आधारभूत धान खरेदीसाठी नोंदणीची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२५ पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र बाजार समितीतील कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची वेळेत नोंदणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी न झाल्यामुळे अनेक धान उत्पादक शेतकरी आधारभूत खरेदी प्रक्रियेपासून वंचित राहिलेले आहे.

ही परिस्थिती लक्षात घेता १५ डिसेंबर २०२५ नंतर किमान एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, अशी ठाम मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना आधारभूत दराचा लाभ मिळावा यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page