दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड यांचे तर्फे सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ व शेख फातिमाबी यांच्या जयंतीचे औचित्याने सामाजिक प्रबोधन व महिलांचा सत्कार कार्यक्रम, महिला महाविद्यालय बल्लारपूर येथे घेण्यात आला.
या कार्यक्रमात सामाजिक प्रबोधनात महिलांचे आरोग्य व शिक्षणातील संधी तसेच पालकांची जबाबदारी याविषयी उपस्थितांचे प्रबोधन करण्यात आले. त्यात सध्या स्थितीत महिलांची सामाजिक स्थिती त्यामधून निर्माण होणारे ताणतणाव व शारीरिक व मानसिक आजार,तसेच आजार टाळण्यासाठी करण्याची उपाययोजना यावर तसेच विद्यार्थ्यांना घडविताना पालकांनी आपल्या इच्छा आकांक्षाचे ओझे त्यांच्यावर न लागता त्यांना त्यांचे आवडी निवडीनुसार आपले शिक्षण व जीवन घडवण्याचे स्वातंत्र्य द्यावे. पण हे करीत असताना त्यांच्या गरजा व वयानुसार तो भरकटू नये,याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड यांनी आपल्या ३५ वर्षाचे वाटचाली मध्ये नेहमी बहुजन समाजाचे एकसंघतेचा व एकजुटीचा विचार मांडलेला आहे. जेणेकरून एक सशक्त व सुदृढ समाज निर्मिती होईल,तसेच आर्थिक व सामाजिक विषमतेची व भेदाची दूरी कमीत कमी करण्याचा मानस लोकांमध्ये रुजेल.
या कार्यक्रमात नगराध्यक्षा, मा. अलकाताई अनिल वाढई यांचे सह,नगरसेविका मा. छाया मडावी, मा. वैष्णवी जुमडे, मा. शिल्पा चुटे, मा. मोना धानोरकर , मा. प्रियंका थुलकर, मा. मेघा भाले,मा. साजिया शेख, मा .वैशाली हुमने, मा. शालू कुमरे मा. काजल तोटावार, मा. करुणा रेब्बावार या उपस्थित नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. अर्चनाताई चौधरी. जिल्हा अध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड चंद्रपूर तर उद्घाटक मा. अलकाताई वाढई, नगराध्यक्ष बल्लारपूर यांची उपस्थिती लाभली. तसेच मार्गदर्शकामध्ये डॉ. श्रुतिका दिवाकर पावडे यांनी महिलांची सामाजिक स्थिती व त्यांचे आरोग्य याविषयी, तर कु. साक्षी माडेकर व कशिश कोडापे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी व आव्हाने तसेच त्यातील यशाच्या वाटा, यावर आपले विचार व्यक्त केले.
प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ.अनिल वाढई,संचालक सीडीसीसी बँक, मा. मायाताई देवगडे गौतमी महिला मंडळ, मा. कल्पनाताई कोडापे, भीमालपेन आदिवासी संस्था, मा. हाजराबानो, जमातीत ए इस्लामी या संघटनांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभाताई माडेकर यांनी, संचालन रितू चनकापुरे यांनी तर आभार प्रदर्शन सुवर्णाताई कष्टी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर माडेकर , अनिल वाग्दरकर, राजेंद्र गौरकर, राजेंद्र खाडे, साहिल घिवे, रोहित चुटे, संकेत चौधरी, प्रज्वल गौरकर, पवन राजगडे , हितेश भिमनवार, मंदाताई वाटेकर ,वैशाली कुळसंगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.