Thursday, August 13, 2026
spot_img
HomeParbhaniनूतनमध्ये भूगोल दिनानिमित्त ' ग्रहांची ओळख ' नाटिका सादर.

नूतनमध्ये भूगोल दिनानिमित्त ‘ ग्रहांची ओळख ‘ नाटिका सादर.

नूतनमध्ये भूगोल दिनानिमित्त ‘ ग्रहांची ओळख ‘ नाटिका सादर.

ज्योत्स्ना वानखेडे: येथील नूतन विद्यालयातील सामाजिकशास्त्र आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने मकर संक्रांत आणि भूगोल दिनानिमित्त बुधवार ( दि. १४ ) रोजी ‘ ग्रहांची ओळख’ ही नाटिका प्रशालेतील बाल कलाकारांनी सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील हे होते. तर व्यासपीठावर उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक रोहीदास मोगल, शंकर बोधनापोड, सांस्कृतिक विभाग प्रमुख शिल्पा बरडे यांची उपस्थिती होती. सांस्कृतिक सहविभाग प्रमुख डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी भूगोल दिनाचे तर संध्या फुलपगार यांनी संक्रांतिचे सांस्कृतिक महत्त्व सांगितले. प्रशालेतील सहशिक्षिका मनोरमा इक्कर दिग्दर्शित ‘ग्रहांची ओळख’ या नाटीकेत इयत्ता सहावीतील आर्या कुलकर्णी, धनश्री शेळके, शब्दा लाटकर, गौरी श्रीखंडे, परी राठोड, आराध्या रोडगे, सुचित्रा रोडगे, वेदिका कटारे, समृद्धी डमरे या विद्यार्थीनींचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ आम्ले यांनी केले. तर आभार प्रदर्शन मुकुंद डमरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनिता सांगुळे, सांस्कृतिक सहविभाग प्रमुख डॉ. सुरेश हिवाळे, विजय धापसे, सूर्यकला सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page