Monday, April 20, 2026
HomeParbhaniसेलू उपजिल्हा रुग्णालयास एअर कंडिशन शववाहिनी चे लोकार्पण.
spot_img

सेलू उपजिल्हा रुग्णालयास एअर कंडिशन शववाहिनी चे लोकार्पण.

सेलू उपजिल्हा रुग्णालयास एअर कंडिशन शववाहिनी चे लोकार्पण.

राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून सेलू शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

ज्योत्स्ना वानखेडे: दि. १६ जाने.राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. श्रीमती मेघनादीदी बोर्डीकर यांच्या विशेष प्रयत्नातून सेलू उपजिल्हा रुग्णालयास वातानुकुलित शववाहिनी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर शववाहिनीचे हस्तांतरण नगरपरिषद सेलुकडे करण्यात आले असून तिचे लोकार्पण आज नगराध्यक्ष मिलिंद दादा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.या  लोकार्पण सोहळ्या प्रसंगी उपनगराध्यक्ष साईराज भैय्या बोराडे नगरसेवक श्री बाळासाहेब काजळे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे, नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी श्री भगवान चव्हाण यांच्यासह नगरपरिषद व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये लोकोपयोगी व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांचा सत्कार करण्यात आला.या नव्या एअर कंडिशन शववाहिनीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून ही सेवा सेलू शहर व परिसरातील २० किलोमीटर परिघात विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या सुविधेमुळे सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक वेळी सन्मानपूर्वक व सुलभ सेवा मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page