Saturday, September 12, 2026
spot_img
HomeChandrapurपुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांनी धनादेश वटविण्यासंदर्भात त्वरीत संपर्क करावा

पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांनी धनादेश वटविण्यासंदर्भात त्वरीत संपर्क करावा

पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांनी धनादेश वटविण्यासंदर्भात त्वरीत संपर्क करावा

Ø समाजकल्याण विभागाच्या संकेतस्थळावर यादी प्रसिध्द

चंद्रपूर( जीमाका): इयत्ता 10 वी, 12 वी च्या परिक्षेला विशेष उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. सदर योजनेअंतर्गत वर्ष 2022-23 आणि 2023-24 मध्ये पात्र विद्यार्थ्यांना धनादेशाद्वारे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी पुरस्काराचा धनादेश आजपर्यंत बँकेतून वटविला नाही. अशा विद्यार्थ्यांच्या नावांची यादी समाज कल्याण विभागाच्या www.acswchandrapur.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली  आहे.
यादीतील विद्यार्थ्यांनी यादी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत पुरस्काराचा वटविण्यात न आलेला धनादेश सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर या कार्यालयात जमा करून नवीन धनादेश प्राप्त करून घ्यावा. अन्यथा एक महिन्याचा कालावधी संपल्यानंतर पुरस्काराची रक्कम शासन खाती जमा करण्यात येईल. परिणामी कालावधी संपल्यानंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्काराचा धनादेश मिळणार नाही. यासाठी विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी कळविले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page