Monday, September 14, 2026
spot_img
HomeFestivals*हेल्पिंग हॅण्ड फॉउंडेशन ट्रस्ट तर्फे बल्लारपूर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा*

*हेल्पिंग हॅण्ड फॉउंडेशन ट्रस्ट तर्फे बल्लारपूर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा*

*हेल्पिंग हॅण्ड फॉउंडेशन ट्रस्ट तर्फे बल्लारपूर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा*

*ज्योत्स्ना वानखेडे*: 
हेल्पिंग हॅण्ड फॉउंडेशन ट्रस्ट , दिल्लीच्या वतीने बल्लारपूर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. लहान मुला-मुलींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत बैलांची आकर्षक सजावट करून पारंपरिक तान्हा पोळ्याचा आनंद लुटला.
तान्हा पोळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत उत्कृष्ट सजावट व सहभागाबद्दल बालकांचा गौरव करण्यात आला. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासह एकूण 10 बालकांना पदक व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सान्वी खनके हिला श्री. सत्यनारायण रामिल्ला व श्री. रमेश गुराला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक धक्ष  गोहणे याला श्री. शशी आंबेकर व श्री. सुनील जैन यांच्या हस्ते देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आराध्य इटणकर , दिवीद मधेलवार व वीरांश मांडरे यांना संस्थेचे सचिव श्रीनिवास चेरकुथोटावार व श्री. उत्तम तेलंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
तसेच काव्यांश वानखेडे , सात्विक तामकले व यश्विन अंगुरी यांच्यासह इतर सहभागी बालकांनाही पारितोषिके देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेल्पिंग हॅण्ड फौंडेशन ट्रस्ट चे अध्यक्ष प्रकाश दोतपेल्ली होते. यावेळी संस्थेचे सचिव श्रीनिवास चेरकुथोटावार, उपाध्यक्ष श्याम मेश्राम, फाउंडर मेंबर चंद्रमणी नगराळे, तसेच प्रेम यादव, तिरुपती उष्कलवार, उत्तम तेलंग, शंकर कोराला आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जैन संघटना, बल्लारपूरचे अध्यक्ष सुनील जैन यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व बालकांना शंकर कोराला व तिरुपती उष्कलवार यांच्या वतीने लॉलीपॉप व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. यामुळे बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
लहान मुलांना महाराष्ट्रातील पारंपरिक सण, संस्कृती आणि कृषी परंपरेची ओळख व्हावी, तसेच त्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीणा दोतपेल्ली, स्वामी जंजरला, सुधीर कस्तुरवार, जय दोतपेल्ली, शुभम नंदगीरवार, शुभम शेट्टीये, अनुप शेट्टीये, रामानंद इरगुराला, वैभव धारणीवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रम उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात संपन्न झाला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page