Friday, April 17, 2026
Homeबल्लारपूरग्रामपंचायतची "ना हरकत" न घेता सनफ्लॅग कंपनी चे अनाधिकृत बांधकाम,अनाधिकृत बांधकाम न...
spot_img

ग्रामपंचायतची “ना हरकत” न घेता सनफ्लॅग कंपनी चे अनाधिकृत बांधकाम,अनाधिकृत बांधकाम न काढल्यास ग्रामसेवा समिती व ग्रामपंचायत‌द्वारे कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा.

ग्रामपंचायतची “ना हरकत” न घेता सनफ्लॅग कंपनी चे अनाधिकृत बांधकाम,अनाधिकृत बांधकाम न काढल्यास ग्रामसेवा समिती व ग्रामपंचायत‌द्वारे कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा.

ज्योत्स्ना वानखेडे: बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) व विसापूर येथे होत असलेल्या सनफ्लॅग आर्यन अॅन्ड स्टिल कंपनी लिमीटेड द्वारे अंडरग्राऊंड कोल माईन सुरू होणार आहे, मात्र या कंपनीद्वारे केंद्र शासनाने मंजुर कोल बेल्ट अनुसार ८०२ हेक्टर शेतकऱ्यांची जमीन कंपनीने अधिग्रहित करण्याचे लक्ष असताना प्रत्यक्षात कंपनीने केवळ १२ हेक्टर शेतजमिन अधिग्रहित केली आहे आणि इतर शेतकऱ्यांच्या शेत जमिनी आतून अंडरग्राऊंड कोळसा काढणार आहे. अधिग्रहित न करता व ग्रामपंचायत ची ना हरकत न घेता कंपनीनें सुरक्षा भिंत बांधून या परिसरातील जनतेसोबत दगाफटका केलेला आहे, त्यामुळे कंपनी च्या या अवैध बांधकाम विरोधात ग्रामसेवा समिती व ग्रामपंचायत ने कंपनीला नोटीस देऊन अनधिकृत बांधकाम काढा किंवा कंपनी विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा पत्रकार परिषदेतून ग्रामपंचायत व ग्रामसेवा समितीचे अध्यक्ष सूर्या अडबाले यांनी दिला आहे, यावेळी सरपंच कविता वैद्य, उपसरपंच मल्लेस कोठारी, विसापूर सरपंच वर्षा कुळमेथे व इतर गावकरी उपस्थित होते.

सनफ्लॅग आयरन अॅन्ड स्टिल कंपनी लिमीटेड, भिवकुंड अंडरग्राऊंड कोल माईन्सचे पांच अनाधिकृत बांधकाम सूरु असून यासाठी ज्या परवानग्या लागतात त्या कंपनीने न घेता परस्पर कंपनीने बांधकाम सूरू केले आहे, या संदर्भात ग्रामपंचायत व ग्रामसेवा समितीचे अध्यक्ष सूर्या अडबाले यांनी कंपनीला नोटीस पाठवून ते अनधिकृत बांधकाम काढण्याची नोटस बजावलेली आहे. दरम्यान एकीकडे कंपनी स्थानिक भूमिपुत्रांना सरसकट नोकऱ्या द्यायला तयार नाही, मिळालेल्या कोल बेल्ट पट्ट्याच्या जमिनी अधिग्रहित करून शेतकऱ्यांना मोबदला देत नाही आणि बळजबरीने जर केवळ 12 हेक्टर जमिनीवर बांधकाम व उरलेल्या ८०२ हेक्टर जमीन आतुन उत्खनन करून बळजबरी करीत असेल तर ग्रामपंचायत व ग्रामसेवा समिती है खपवून घेणार नाही, कंपनीचे एजंट ज्या पद्धतीने नांदगाव व विसापूर परिसरातील जमीन धारकांना आमिष दाखवून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन कंपनीच्या बांधकामाला विरोध नसल्याचे दाखवत आहे त्या एजंट लोकांना धडा शिकवू व सनफ्लॅग आयरन अॅन्ड स्टिल कंपनी लिमीटेड, भिवकुंड अंडरग्राऊंड कोल माईन्स आम्ही होऊ देणार नाही असा सरसकट इशारा ग्रामपंचायत व ग्रामसेवा समिती यांनी दिलेला आहे. जे काही केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार व शासन प्रशासन यांनी दिलेल्या संपूर्ण परवानग्या रद्द करण्यात यावी जो पर्वत ग्रामपंचायत व ग्रामसेवा समिती आमसभेतमध्ये एकमताने ठराव घेत नाही व माननीय जिल्हाधिकारी यांना देत नाही तो पर्यत सनफ्लॅग आयरन अॅन्ड स्टिल कंपनी लिमीटेड, भिवकुंड अंडरग्राऊंड कोल माईन्सचे संपूर्ण कामाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी उपस्थित श्री. छत्रपती शिवाजी महाराज समिती, विसापूर समितीचे बंडू गिरडकर व इतर गावकरी उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page