Friday, September 11, 2026
spot_img
Homeबल्लारपूर*एक दिवसीय धम्म शिबीर संपन्न*

*एक दिवसीय धम्म शिबीर संपन्न*

*एक दिवसीय धम्म शिबीर संपन्न*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
      त्रिरत्न बौद्ध महासंघ बल्लारपुर द्वारा रविवार दिनांक 6 सप्टेबर 2026 ला भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार बल्लारपुर येथे *एक दिवसीय धम्म शिबीर* यशस्वीपने पार पडले. शिबीराचे नेतृत्व *धम्मचारिणी बोधिमोदिनी* यांनी केले. *मनाची मलिनता दूर करने हे सद्धमाचे कार्य होय* या विषयाला अनुसरण त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, लोभ द्वेष आणि मोह (अज्ञान) हे तीन विष आहे ज्यामुळे चित्त मलिन होते आणि जीवनात दुःख निर्माण होते. मनाची मलिनता नष्ट करून निर्वाण प्राप्त करता येते. हिच बुद्धाच्या सद्धम्माची शिकवण आहे.
   दूस-या सत्रात भास्कर भगत यांनी सुंदर बुद्ध गीत सादर केले. गटचर्चा, प्रश्नोत्तर आणि मनोगत घेन्यात आले.
    शिबिराची शुरुवात आदर्शाच्या पुजेने झाली. धम्ममित्र गोंगलेताई आणि विद्या भगत यांनी त्रिशरण पंचशील आणि बुद्धपूजेचे पठन केले. पाहुण्याचा परिचय धम्ममित्र चारुशिला ब्राह्मणे यांनी करुन दिला. शिबिराचे उत्कृष्ट संचालन धम्ममित्र जयदास भगत यांनी तर आभार प्रदर्शन धम्ममित्र ज्ञानानंद शिंदे यांनी केले. धम्ममित्र दर्शना रामटेके यांनी धम्मपालन गाथा घेवून शिबीराची सांगता केली. शिबिराला मोठ्या संख्याने उपस्थिति होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page