क्रूर पणे समाज बांधवाची हत्या, जाहीर निषेध आरोपींना फाशी द्या
ज्योत्स्ना वानखेडे:
नागेपल्ली जिल्हा गडचिरोली येथील आर्य वैश्य कोमटी बांधव श्री. रवींद्र तंगडपल्लीवार ,पोस्ट आरडी एजन्ट चं काम करून पोट भरणाऱ्या आर्य वैश्य कोमटी समाज बांधवाची निर्घृण हत्या करण्यात आली तसेच अंत्यविधी साठी आलेले त्यांचे पाहुणे श्री. सुनील कोलपाकवार (रा बोरी) व श्री. यादव कोलपाकवार (रा आष्टी) यांचा अपघाती मृत्यू झाला.
या एकंदर घटनेत तिघांचा जीव गेला ही घटना फार दुःखद झाली आहे.
मूळ चोरी करण्याच्या उद्देशाने घटना घडली आहे व अपहरण करून तंगडपल्लीवार ची हत्या केली या आरोपीना अटक झाली आहे,पण त्यांना इतर कोणतीही शिक्षा न देता फक्त फाशीचं झाली पाहिजे यासाठी आर्य वैश्य कोमटी समाज बल्लारपूर द्वारे दि.2 फेब्रुवारी 2026 रोज सोमवारला सकाळी 10.30 वाजता एक निवेदन मान. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मान. तहसीलदार बल्लारपूर मार्फत नायब तहसिलदार यांना सुपूर्द करण्यात आले तसेच मा. उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
या प्रसंगी बल्लारपूर आर्य वैश्य कोमटी समाजाचे अध्यक्ष डॉ. विजय बोंगीरवार , माजी अध्यक्ष भाऊसाहेब येगिनवार, प्रदीप भास्करवार, डॉ. रमेश यमसानिवार, गिरीश गंधेवार, प्रशांत दोंतुलवार, अभिजित भास्करवार, मंगेश रेगुंडवार,नीरज पद्मावार, वासू यमसानिवार, प्रभाकर गजाडीवार आणि सर्व पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.