चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांची निवड प्रक्रिया यशस्वी
ज्योत्स्ना वानखेडे:
चंद्रपूर महानगरपालिकेच्या विशेष सभेत मा. श्रीमती संगीता राजेंद्र खांडेकर यांची महापौरपदी मा. श्री प्रशांत आनंदराव दानव यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली.
मा. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी मा. श्री विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रसंगी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी महानगरपालिका आयुक्त मा. श्री अकुनुरी नरेश, अतिरिक्त आयुक्त मा. श्री चंदन पाटील, उपायुक्त मा. श्री संदीप चिद्रवार, नगरसचिव मा. श्री नरेंद्र बोबाटे, शहर अभियंता मा. श्री रविंद्र हजारे, सहायक आयुक्त मा. श्रीमती शुभांगी सूर्यवंशी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांना हार्दिक शुभेच्छा! देण्यात आल्या.