ज्योत्स्ना वानखेडे:
दिनांक : १४ एप्रिल २०२६ रोजी बल्लारपूर येथे खालसा पंथ स्थापना दिनानिमित्त बैसाखी गुरुपर्व मोठ्या उत्साहात व श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला.
या पावन दिनानिमित्त गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शीख परंपरेतील शौर्य, त्याग व धर्मनिष्ठेचा गौरव करण्यात आला. यावेळी गुरू परंपरेचा महान संदेश — “पीओ पाळू खंडे धार, होये जनम सुहेला” — याची आठवण करून देण्यात आली.
या मंगलमय प्रसंगी मा. डॉ. अल्का अनिल वाढई (नगराध्यक्षा, न. प. बल्लारपूर), मा. श्रीमती डॉ. रजनीताई हजारे (माजी नगराध्यक्ष), मा. श्री. डॉ. अनिल वाढई (संचालक, जि. म. सह. बँक, चंद्रपूर)
या मान्यवरांचा गुरुद्वारा समितीच्या वतीने शाल देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
तसेच या प्रसंगी खालील मान्यवरांची उपस्थिती लाभली :
मा. श्रीमती मधु कपूर , श्री. तेजिंदर दारी, श्री. राजू दारी, श्री. जय कुमार गिदवाणी, श्री. बल्लू शेठ गिदवाणी, श्री. अश्विन खंडेलवाल, श्री. गोपाल खंडेलवाल, श्री.भाटिया जी, श्री.छाबरा जी, श्री. गगन लालवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी शीख समाजाच्या परंपरा, संस्कार व देशासाठी केलेल्या योगदानाचे स्मरण करत सर्वांना बैसाखी गुरुपर्वाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.