Wednesday, April 15, 2026
HomeChandrapurचंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा-आ...
spot_img

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा-आ सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा

आ सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

Jyotsna Wankhede: चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्याची मागणी आ सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की चंद्रपूर शहराला सुमारे ८०० हून अधिक वर्षांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोंड राजवटीपासून भोसलेकालीन परंपरेपर्यंत या शहराने सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक दृष्ट्या उल्लेखनीय प्रगती साधलेली आहे. किल्ले, प्राचीन वास्तू व विविध देवस्थाने ही या शहराची ओळख ठरली आहेत. माता महाकाली, श्री अंचलेश्वर आणि भगवान श्री विठ्ठल ही या शहराची आराध्य आहेत.

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर हे अत्यंत प्राचीन व ऐतिहासिक देवस्थान असून, अनेक दशकांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. मंदिर परिसरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन व उत्सव आयोजित केले जातात.

दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मंदिरातून भव्य रथयात्रा काढण्यात येते. हा रथ संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करतो. या वेळी हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. शहरातील विविध भागांतून नागरिक, महिला मंडळे, वारकरी संप्रदायाचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडितपणे सुरू असून, शहराच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.विठू नामाचा गजर करत भाविक सतत या मंदिरात येतात.

दरवर्षी भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा व इतर मूलभूत सुविधांची आवश्यकता भासते. मंदिरास ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यास शासन स्तरावरून आर्थिक व प्रशासकीय सहाय्य उपलब्ध होऊन सदर कामे अधिक सक्षमपणे करता येईल. हे मंदिर चंद्रपूर शहरातील नागरिकांचा भावनिक ठेवा आहे असेही आ मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास शासनाच्या नियमानुसार ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा यासाठी चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीचा ठराव  आ. मुनगंटीवार यांच्या विनंती नुसार पारित करण्यात आला आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page