Thursday, April 16, 2026
HomeChandrapurविधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा
spot_img

विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा

विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा

Ø 22 फेब्रुवारी रोजी वरोरा येथे आयोजन

चंद्रपूर( जीमाका): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधीसेवा प्राधिकरण चंद्रपूर व वरोरा तालुका विधीसेवा प्राधिकरण आणि चंद्रपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने 22 फेब्रुवारी 2026 रोजी वरोरा येथे विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.16) आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य न्याय दंडाधिकारी पी.पी. कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, वरोराचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, तहसीलदार योगेश कौटकर, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव सुधीर इंगळे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, वरोरा येथे होणारे विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्यात सर्व विभागांनी आपापल्या विभागाचे स्टॉल लावून नागरिकांमध्ये जनजागृती करावी, जेणेकरून नागरिकांना योजनांबद्दल माहिती मिळेल आणि त्यांना त्याचा लाभ घेता येईल.
सदर महामेळावा हा 22 फेब्रुवारी रोजी स्व. दादासाहेब देवतळे शेतकरी भवन, सद्भवना चौक, अभ्यंकर वॉर्ड, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मागे, वरोरा येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. शासकीय योजनांची माहिती व त्याकरीता अर्ज करण्याची सुवर्ण संधी या मेळाव्यातून मिळणार आहे. तसेच भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे सुध्दा आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळाव्याला भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page