Friday, April 17, 2026
HomeChandrapurआ सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने म्हाडा च्या 2004 घरांना मंजुरी, रेल्वे विभागातर्फे...
spot_img

आ सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने म्हाडा च्या 2004 घरांना मंजुरी, रेल्वे विभागातर्फे प्रस्तावित बेदखल कारवाई स्थगितीची मागणी

आ सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने म्हाडा च्या 2004 घरांना मंजुरी, रेल्वे विभागातर्फे प्रस्तावित बेदखल कारवाई स्थगितीची मागणी—- डॉक्टर मंगेश गुलवाडे

Jyotsna Wankhede:
सावरकर नगर, उडिया बस्ती, महाकाली कॉलरी व बगड खिडकी, जिल्हा चंद्रपूर येथील 191 कुटुंबांना रेल्वे प्रशासनाकडून दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी बेदखल नोटीस देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मा. आमदार डॉ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

सदर कुटुंबे ही रेल्वे अधिग्रहणग्रस्त असून त्यांच्या पुनर्वसनासाठी मा. डॉ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाकडून नवीन चंद्रपूर (म्हाडा) येथे 2004 घरांच्या निर्मितीस मान्यता मिळालेली आहे. संबंधित कुटुंबांचे स्थलांतर प्रक्रियेत असून लवकरच त्यांचे पुनर्वसन होणार आहे.

या अनुषंगाने पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बेदखल कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तातडीने घर बेदखल  कारवाई झाल्यास नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, नगरसेविका सुनिता ताई जयस्वाल, अमित निरंजने, बादल जयस्वाल  वाणी साधनवार, स्वीय सहाय्यक संजय रेनचवर , आशिष गिरडकर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या पाठपुराव्यामुळे 2004 घरांच्या निर्मितीस मान्यता मिळालेली असून लवकरच सर्व पात्र कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रशासनाने मानवीय दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page