Thursday, April 16, 2026
HomeEducationराजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विदयुत विभागातर्फे एक आठवड्याच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामला...
spot_img

राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विदयुत विभागातर्फे एक आठवड्याच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामला प्रारंभ

राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विदयुत विभागातर्फे एक आठवड्याच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामला प्रारंभ

संशोधनवृत्ती, नवोपक्रम आणि व्यावहारिक ज्ञानाची सांगड घालणे काळाची गरज – विनोद दत्तात्रेय

राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विदयुत विभागातर्फे एक आठवड्याच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामला प्रारंभ

Jyotsna Wankhede : तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात शिक्षकांनी आपले ज्ञान सतत अद्ययावत ठेवणे आवश्यक असून संशोधनवृत्ती, नवोपक्रम आणि व्यावहारिक ज्ञानाचा समन्वय साधणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष विनोद दत्तात्रेय यांनी केले. ते सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

 

 

विद्युत अभियांत्रिकी विभाग आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान “Interdisciplinary Applications of Electrical Engineering in Smart and Sustainable Technologies (IAEESST-26)” या विषयावर एक आठवड्याचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे. 

 

कार्यक्रमाचे उद्घाटन विनोद दत्तात्रेय यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटनप्रसंगी विनोद दत्तात्रेय यांनी विद्युत अभियांत्रिकी ही आधुनिक समाजाच्या प्रगतीचा आधारस्तंभ असल्याचे नमूद केले. स्मार्ट सिटी, नवीकरणीय ऊर्जा, ऑटोमेशन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या विकासात या शाखेची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने परिणामाधारित शिक्षण, बहुविषयक अध्ययन आणि उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील समन्वयावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांनी आपल्या मार्गदर्शनात अशा कार्यक्रमांमुळे शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यात वाढ होऊन विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येते, तसेच वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा विदयुत विभागाची महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले.

 

या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये नवीकरणीय ऊर्जा, स्मार्ट ग्रिड, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, ऊर्जा कार्यक्षमता, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, ग्रीन एनर्जी आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत. सहभागी प्राध्यापकांनी विविध सत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेत चर्चा व प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपले ज्ञान वृद्धिंगत केले.

 

देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील सुमारे ८० प्राध्यापकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. अमरावती येथील तज्ज्ञ डॉ. प्रशांत बेडेकर यांनी सहभागी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका श्रीदेवी आक्केवार यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजक विद्युत विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र धात्रक, समन्वयक डॉ. सुभाष कामडी, प्राध्यापक अमित आक्केवार तसेच विद्युत विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

 

हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि कौशल्य विकासासाठी मोलाचा ठरणार आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page