एकनाथ वैद्य, शिक्षक सेवानिवृत्त, सामाजिक कामात मोठा सहभाग!
ज्योत्स्ना वानखेडे:
नरखेड येथील विद्यार्थ्याना नेहमी मार्गदर्शन करणारे,हडस हायस्कूल इंग्रजी विषयाचे शिक्षक दिनांक २८ फेब्रुवारी ला सेवानिवृत्त झाले.
त्यांनी आपल्या शिक्षक म्हणून कार्याकाळात पुर्वी अमरावती, नरखेड येथे इंग्रजी विषयाचे प्रथम वर्ष बी ए. पासून पदवित्तोर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले विद्यार्थी उपजिल्हाधिकारी, सहा.मुख्याधिकारी पदावर कार्यरत आहेत.
प्राचार्य अजय लाबडे यांनी हडस मधिल तत्कालीन गणित शिक्षक स्व. विनायक ढोक व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित करून नरखेड वासियांना एकनाथ वैद्य यांच्या सामाजिक कामाची प्रचिती घडवून आणली हे वास्तव आहे असे प्रतिपादन केले.
हडस हायस्कूल येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात प्राचार्य अजय लाबडे, डाॅ. सौ.प्रज्ञा देशपांडे, डाॅ.सुशील वंजारी, अमोघ चांदुरकर. माजी शिक्षक प्रमोद रेवतकर, श्रीमती यशोदा पवार यांनी विचार व्यक्त केले.
निरोप सत्कार कार्यक्रमात हडस हायस्कूल शिक्षक शिक्षिका व नरखेड निवासी श्री व सौ उदय बोडखे उपस्थित होते.
[ फोटो :- सेवानिवृत्त इंग्रजी विषय शिक्षक एकनाथ वैद्य सत्काराला उत्तर देताना, मंचावर प्राचार्य अजय लाबडे, सौ.माधुरी वैद्य ]