तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कर्मवीर विद्यालयाचा डंका!
*Jyotsna Wankhede*: तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात *कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, येनबोडी, बल्लारपूर* येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. दिनांक १३ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भालेराव पब्लिक स्कूल, बल्लारपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात उच्च माध्यमिक गटातून विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी *प्रथम क्रमांक* पटकावला.
*अभिजित कैलास कोहरे* आणि *वीर राकेश येल्लोरे* यांनी ‘Green India Highway’ हा नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केला. या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला. तसेच याच ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या *वक्तृत्व स्पर्धेत* अभिजित कैलास कोहरे याने द्वितीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
या यशासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका *सौ. सुधा वासाडे मॅडम*, उपमुख्याध्यापिका सौ. पडोळे मॅडम, पर्यवेक्षक श्री. घुगल सर, तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री. मोहितकर सर आणि कु. बनकर मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या दुहेरी यशाबद्दल विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाची मान उंचावली असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.