Sunday, April 19, 2026
HomeWaroraभुमी अभिलेख कार्यालयाकडून विविध ठिकाणी महाराजस्व अभियानाचे आयोजन
spot_img

भुमी अभिलेख कार्यालयाकडून विविध ठिकाणी महाराजस्व अभियानाचे आयोजन

भुमी अभिलेख कार्यालयाकडून विविध ठिकाणी महाराजस्व अभियानाचे आयोजन

चंद्रपूर( जीमाका): भूमि अभिलेख विभागाच्या विविध योजना व सेवांची माहिती देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान विविध ठिकाणी घेण्यात येणार आहे. या शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख यांनी केले आहे.

वरोरा तालुक्यात या ठिकाणी होणार महाराजस्व अभियान : 1) दि. 7 मार्च रोजी सकाळी 10 वा. सार्वजनिक वाचनालय तलाठी कार्यालय समोर, खांबाडा 2) 7 मार्च रोजी ग्रामपंचायत सभागृह टेंभुर्डा 3) 14 मार्च रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आनंदवन 4) 14 मार्च रोजी ग्रामपंचायत परिसर, तुळाना 5) 10 एप्रिल रोजी शेतकरी भवन, मांढेळी 6) 10 एप्रिल रोजी त्रिमुर्ती देवस्थान सभागृह, खरवड 7) 17 एप्रिल रोजी गुरुदेव समाज भवन, खेमजई 8) 17 एप्रिल रोजी लक्ष्मी नारायण देवस्थान, चारगाव बुं येथे महाराजस्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

भद्रावती तालुक्यात या ठिकाणी होणार महाराजस्व अभियान : 1) दि. 7 मार्च रोजी सकाळी 10 वा. हनुमान मंदीर परिसर, नंदोरी 2) 14 मार्च रोजी ग्रामपंचायत, मांगली रै 3) 10 एप्रिल रोजी ग्रामपंचायत, चंदनखेडा 4) 17 एप्रिल रोजी किसान भवन, घोडपेठ 5) 8 मे रोजी ग्रामपंचायत समाज भवन, मुधोली 6) 15 मे रोजी नगर परिषद सभागृह, भद्रावती येथे आयोजन.

सिंदेवाही तालुक्यात या ठिकाणी होणार महाराजस्व अभियान : 1) दि. 7 मार्च रोजी सकाळी 11 वा. मोहाळी (नलेश्वर) येथे 2) 14 मार्च रोजी नवरगाव येथे 3) 10 एप्रिल रोजी लोनवाही 4) 17 एप्रिल रोजी लोनवाही 5) 8 मे रोजी नगर पंचायत, सिंदेवाही येथे आयोजन

उपअधिक्षक भूमि अभिलेख विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांमध्ये ई-रेकॉर्ड्स, भु-नक्शा पोर्टलची माहिती, नकाशे डाउनलोड प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नगर भूमापन व गावठाण भूमापनाशी संबंधित प्रलंबित फेरफार अर्ज निकाली काढणे तसेच इंप्तिस प्रणालीअंतर्गत ऑनलाईन फेरफार अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

भूसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणांतील प्रलंबित कमी-जास्त पत्रके तयार करणे, पोटहिस्सा व आकारफोड प्रकरणांमध्ये अभिलेख दुरुस्ती, ई-मोजणी 2.1 प्रणालीची माहिती, मोजणी अर्ज प्रक्रिया व कार्यपद्धतीबाबत जनजागृती तसेच मोजणी अर्ज ऑनलाईन स्वीकारले जाणार आहेत. मोजणी प्रकरणातील ‘क’ प्रत ऑनलाईन कशी उपलब्ध होते याची माहितीही दिली जाईल.

महाभूमी पोर्टलवरील ई-फेरफार, ई-मोजणी, ई-चावडी व ई-रेकॉर्ड सेवांचा वापर, तुकडेबंदी कायद्यातील बदल तसेच भूमि अभिलेख विभागाच्या विविध योजना व सेवांची माहिती शिबिरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख तथा उप अधीक्षक वरोरा, भद्रावती आणि सिंदेवाही यांनी केले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page